सनी लिओनीच्या 'केनेडी'ची सिडनी वारी, अभिनेत्रीचं होतंय सर्वत्र कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 18:33 IST2023-06-10T18:32:33+5:302023-06-10T18:33:13+5:30

Sunny Leone : सनी लिओनीच्या कामाची जगभरात चर्चा होत असताना तिचा आगामी चित्रपट 'केनेडी' आता सिडनी फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवला जाणार आहे.

Sydney Vaari of Sunny Leone's 'Kennedy', the actress is being appreciated everywhere | सनी लिओनीच्या 'केनेडी'ची सिडनी वारी, अभिनेत्रीचं होतंय सर्वत्र कौतुक

सनी लिओनीच्या 'केनेडी'ची सिडनी वारी, अभिनेत्रीचं होतंय सर्वत्र कौतुक

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी(Sunny Leone)ने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. जगभरात तिच्या कामाच्या चर्चा होत असताना तिचा आगामी चित्रपट केनेडी आता सिडनी फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवला जाणार आहे. केनेडीमध्ये सनी लिओनी चार्लीची भूमिका साकारत आहे जी भूमिका नक्कीच कमालीची आहे. या चित्रपटाची नुकतीच आदरणीय ज्युरींनी कान्स चित्रपट महोत्सवात मिडनाईट स्क्रीनिंगसाठी निवड केली होती. 

मध्यरात्रीच्या प्रदर्शनासाठी निवडलेला हा एकमेव भारतीय चित्रपट होता. या चित्रपटाने सात मिनिटांची स्टँडिंग ओव्हेशन देखील मिळवला. सनी लिओनीच्या चार्लीमध्ये केलेल्या भूमिकेचे कौतुक होते आहे. कान्स पर्यंत मर्यादित न राहता हा चित्रपट  सिडनी फिल्म फेस्टिवल मध्ये दाखवला जाणार आहे. सिडनी फिल्म फेस्टीवल १४ आणि १७ जून रोजी होणार आहे.

सनी लिओनीने मानले आभार

सिडनी फिल्म फेस्टिव्हलबद्दल सनी लिओनी म्हणाली, कान्स फिल्म फेस्टिव्हल खूप यशस्वी ठरला आणि मी यासाठी खूप कृतज्ञ आहे. हा चित्रपट आता  सिडनी फिल्म फेस्टिव्हल मध्ये दाखवला जाणार आहे. अनुराग सर आणि संपूर्ण टीमचे आभार मानते की यासारखा उत्तम चित्रपट मला करायला मिळाला. केनेडीचे दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केले असून त्यात राहुल भट्ट सहकलाकार आहेत. केनेडीच्या सोबतीने सनीकडे अजून कमालीचे प्रकल्प आहेत.

Web Title: Sydney Vaari of Sunny Leone's 'Kennedy', the actress is being appreciated everywhere