'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाला कमी प्रतिसाद? निर्मात्यांची कमाई वाढवण्यासाठी खास ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 11:47 IST2024-03-26T11:46:14+5:302024-03-26T11:47:30+5:30

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाविषयी स्पेशल ऑफर निर्मात्यांनी आज सर्वांसाठी ठेवलीय. त्यामुळे आज तुम्ही 'स्वातंत्र्यवीर सावरकर' पाहण्यासाठी या खास ऑफरचा वापर करु शकता. सविस्तर वाचा बातमी

Swatantryaveer Savarkar movie team special offer one plus one ticket offer | 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाला कमी प्रतिसाद? निर्मात्यांची कमाई वाढवण्यासाठी खास ऑफर

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाला कमी प्रतिसाद? निर्मात्यांची कमाई वाढवण्यासाठी खास ऑफर

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा २२ मार्चला रिलीज झाला. रणदीप हूडाने सिनेमात वीर सावरकरांची भूमिका साकारली आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाची खुप चर्चा होती. सिनेमाच्या टिझर, ट्रेलरलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पण सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये मात्र अजिबात गर्दी दिसली नाही. त्यामुळे सिनेमाची कमाई वाढवण्यासाठी सिनेमाच्या निर्मात्यांनी आज खास ऑफर प्रेक्षकांना दिली आहे.

आज २६ मार्चला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाची खास ऑफर आहे. आज तुम्हाला एका तिकिटासह एक मोफत तिकीटाची ऑफर मिळणार आहे. ही ऑफर फक्त आजसाठी म्हणजेच २६ मार्चपर्यंत आहे. ही ऑफर घ्यायची असेल तर तुम्हाला एक कोड देखील लागेल. तो कोड SVSBOGO आहे. या ऑफरची माहिती झी स्टुडिओ ऑफिशियलच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्टरमध्ये शेअर करण्यात आली आहे.

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाबद्दल सांगायचं तर,  क्रांतीकारक वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा आहे. रणदीप हूडा सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय अंकिता  लोखंडे. राजेश खेरा, अमित सियाल आदी कलाकार सुद्धा महत्वाच्या  भूमिकेत झळकत आहेत. रणदीपनेच या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. हा सिनेमा हिंदीसह मराठी भाषेतही रिलीज झालाय.

Web Title: Swatantryaveer Savarkar movie team special offer one plus one ticket offer