रणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, पहिल्या दिवशी किती कमावले?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 09:45 AM2024-03-23T09:45:36+5:302024-03-23T09:46:46+5:30

Swatantryaveer Savarkar Box Office Collection Day 1 : बहुचर्चित असलेल्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाला प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाल्याचं दिसत नाही.

swatantryaveer savarkar box office collection day 1 randeep hood movie earned 1cr | रणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, पहिल्या दिवशी किती कमावले?

रणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, पहिल्या दिवशी किती कमावले?

बॉलिवूड अभिनेता रणदीप हु्ड्डा मुख्य भूमिकेत असलेला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा शुक्रवारी (२२ मार्च) प्रदर्शित झाला. वीर सावरकर यांचा जीवनपट या सिनेमातून मोठ्या पडद्यावर उलगडण्यात आला आहे. या सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका बखुबीने निभावणाऱ्या रणदीप हुड्डाचं सर्वत्र कौतुक होत आहे. या सिनेमाच्या ट्रेलरपासून प्रेक्षकांची 'स्वांतत्र्यवीर सावरकर' सिनेमाबाबतची उत्सुकता वाढली होती. 

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचं जोरदार प्रमोशनही करण्यात आलं होतं. आता सिनेमाच्या पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. बहुचर्चित असलेल्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाला प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाल्याचं दिसत नाही. हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १ कोटींची कमाई केली आहे. आता वीकेंडला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

रणदीप हुड्डाबरोबर 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात अभिनेत्री अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात तिने वीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारली आहे. तर या सिनेमातून रणदीप हुड्डाने दिग्दर्शनात पाऊल ठेवलं आहे. आता हा सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी होईल का? हे पाहावं लागेल. 

Web Title: swatantryaveer savarkar box office collection day 1 randeep hood movie earned 1cr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.