सोनाली बेंद्रेला भेटून भावूक झाली हृतिकची एक्स-वाईफ सुजैन खान!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 10:50 IST2018-08-14T10:49:49+5:302018-08-14T10:50:34+5:30

सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेतेय. काही दिवसांपूर्वी सोनालीने शेअर केलेल्या एका फोटोने सगळ्यांनाच हळवे केले होते. 

Sussanne Khan posts a picture with Sonali Bendre | सोनाली बेंद्रेला भेटून भावूक झाली हृतिकची एक्स-वाईफ सुजैन खान!!

सोनाली बेंद्रेला भेटून भावूक झाली हृतिकची एक्स-वाईफ सुजैन खान!!

सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेतेय. काही दिवसांपूर्वी सोनालीने शेअर केलेल्या एका फोटोने सगळ्यांनाच हळवे केले होते. या फोटोत सोनाली बाल्ड लूकमध्ये दिसली होती. अर्थात तिने मुंडण केले होते. याचदरम्यान सोनालीची मैत्रिण सुजैन खान आणि गायत्री न्यूयॉर्कमध्ये तिला भेटायला पोहोचल्या होत्या. सोनालीला भेटून परतल्यावर सुजैनने पुन्हा एकदा सोनालीचे काही फोटो आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत. शिवाय एक इमोशनल पोस्टही लिहिली आहे. या नव्या फोटोत सुजैन, सोनाली व गायत्री या तिघींनी एकत्र पोज दिली आहे. केसांचे मुंडण केलेले असल्याने सोनालीने डोक्यावर हॅट घातलेली दिसतेय. 

‘मला खात्री आहे की, आयुष्यात कितीही वादळं येवोत, आपण एकमेकांच्या सोबतीने घेऊन किना-यापर्यंत पोहोचू, मला खात्री आहे प्रश्नांनी भरलेल्या या जगात माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे असतील. मी खात्रीपूर्वक सांगू शकते की, येणारा काळ सुंदर असणार...क़ारण मी या प्रवासात तुझ्यासोबत असणार...’ असे सुजैनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

सोनाली बेंद्रेला ‘हायग्रेड कर्करोगा’चे निदान झाले असून तिच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू आहेत. स्वत: सोनालीने सोशल मीडियावर याची माहिती दिली होती. ‘वैद्यकीय चाचण्यांत मला हायग्रेड कर्करोग असल्याचे निदान करण्यात आले आहे. असे काही होईल, हे मला कदापिही वाटले नाही. सातत्याने होणाऱ्या वेदनांमुळे मी चाचणी करण्याचा निर्णय घेतला. त्यात हा चक्रावून टाकणारा अहवाल समोर आला,’ असे साेनालीने सांगितले होते.

 

 

Web Title: Sussanne Khan posts a picture with Sonali Bendre