सुश्मिता सेनच्या घरी नव्या नवरीचा गृहप्रवेश, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 12:39 IST2019-06-20T12:38:54+5:302019-06-20T12:39:16+5:30

सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन नुकताच लग्नबंधनात अडकला. अभिनेत्री चारू असोपा हिच्यासोबत बंगाली पद्धतीने त्याने लग्नगाठ बांधली. गोव्यात थाटामाटात पार पडलेल्या या विवाह सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

sushmita sen family welcomes charu asopa at home with bengali rituals griha pravesh video viral | सुश्मिता सेनच्या घरी नव्या नवरीचा गृहप्रवेश, पाहा व्हिडीओ

सुश्मिता सेनच्या घरी नव्या नवरीचा गृहप्रवेश, पाहा व्हिडीओ

ठळक मुद्देराजीव व चारू गत वर्षभरापासून एकमेकांना डेट करत होते. चारू ही एक टीव्ही अभिनेत्री आहे.

सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन नुकताच लग्नबंधनात अडकला. अभिनेत्री चारू असोपा हिच्यासोबत बंगाली पद्धतीने त्याने लग्नगाठ बांधली. गोव्यात थाटामाटात पार पडलेल्या या विवाह सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. लग्नानंतर आता नववधूच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओत सुश्मिता सेनची आई नव्या सुनेचे स्वागत करताना दिसतेय.


गत १६ जूनला राजीवने   गर्लफ्रेंड चारू असोपाशी लग्न केले. गोव्यात झालेल्या या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये अतिशय जवळचे लोक व मित्रमंडळी तेवढे उपस्थित होते. सुश्मिताने या लग्नाच्या विधींचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तिच्य इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. भावाच्या लग्नात सुश्मिताने दोन मुली आणि बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल यांच्यासोबत प्रचंड धम्माल केली.  रोहमन शॉलसोबत तिने खास रोमँटिक डान्स केला. 


राजीव आणि चारू यांच्या साखरपुड्याची अंगठी दाखवणारा  एक व्हिडीओही तिने शेअर केला. याशिवाय मुलींसोबत ‘चुनरी डान्स’चा व्हिडीओही सुश्मिताने पोस्ट केला.
राजीव व चारू गत वर्षभरापासून एकमेकांना डेट करत होते. चारू ही एक टीव्ही अभिनेत्री आहे.

चारू ही टेलिव्हिजनची एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. २००९ मध्ये ‘अगल जनम मोहे बिटिया ही कीजो’ या मालिकेतून तिने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. ‘मेरे अंगने में’ आणि ‘जीजी मां’ या मालिकांमुळे ती लोकप्रिय झाली. सध्या ती ‘विक्रम बेताल’ या मालिकेत काम करतेय.

२०१६ मध्ये चारूने नीरज मालवीयसोबत साखरपुडा केला होता.  ‘मेरे अंगने में’ या मालिकेत चारू व नीरज यांनी बहीण-भावाची भूमिका साकारली होती. या सेटवर दोघांत प्रेम झाले आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्याआधीच हे नाते तुटले. नीरजसोबत ब्रेकअप झाल्यानंतर चारूच्या आयुष्यात राजीवची एन्ट्री झाली. राजीव हा पेशाने मॉडेल आहे. 

Web Title: sushmita sen family welcomes charu asopa at home with bengali rituals griha pravesh video viral