पुन्हा एकदा सुष्मिता सेन होतेय ट्रोल, यावेळी चक्क गॉगल ठरला कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 18:35 IST2022-07-21T18:14:02+5:302022-07-21T18:35:39+5:30

सोशल मीडियावर मोठ्या संख्येने सुष्मिताचे फॉलोअर्स आहेत.अनेकांसाठी सुष्मिता आदर्शच आहे. त्यामुळे कितीही झालं, काहीही झालं तरी सुष्मिताला पाठिंबा देणारेही चाहत्यांची संख्या ही तितकीच मोठी आहे.

Sushmita sen Brutally Trolled After She Shares Her Happy Photo | पुन्हा एकदा सुष्मिता सेन होतेय ट्रोल, यावेळी चक्क गॉगल ठरला कारणीभूत

पुन्हा एकदा सुष्मिता सेन होतेय ट्रोल, यावेळी चक्क गॉगल ठरला कारणीभूत

गेल्या काही दिवसांपासून सुष्मिता सेन आणि ललित मोदी या दोघांच्या अफेअरच्या चर्चा या संपता संपत नाही. रोज काही ना काही चर्चा या दोघांविषयी रंगत असतात. इतकंच काय तर सोशल मीडियावर याचे मिम्सही व्हायरल होत असतात. सततच्या होणार्‍या चर्चांना सुष्मिता सेननेसुद्धा पूर्णविराम देत चांगलेच उत्तर दिले होते.आता सुष्मिता जे काही करते त्यावर चाहत्यांचेही बारकाईने लक्ष असतं असंच दिसतंय. सोशल मीडियावर मोठ्या संख्येने सुष्मिताचे फॉलोअर्स आहेत.अनेकांसाठी सुष्मिता आदर्शच आहे. त्यामुळे कितीही झालं, काहीही झालं तरी सुष्मिताला पाठिंबा देणारेही चाहत्यांची संख्या ही तितकीच मोठी आहे. 


तुर्तास सुष्मिता सेनला पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. नुकतेच सुष्मिताने तिचा एक नवीन फोटो चाहत्यांसह शेअर केला होता. निळ्या रंगाचा ड्रेस, चेहर्‍यावर गॉगल लावलेल्या फोटोत सुष्मित खूप आनंदी दिसत आहे.अतिशय रिफ्रेश करणारा हा फोटो पाहून अनेकांनी तिच्या या लूकचे कौतुक केले. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. चाहतेच नाही तर अनेक सेलिब्रेटींनी देखील लाईक्स देत पसंती दिल्याचे पाहायला मिळाले.यावर सुष्मिताची मुलगी रिनी सेननही कमेंट केली होती.पण आता याच फोटोमुळे सुष्मिताला पुन्हा टार्गेट केले जात आहे.

ट्रोलिंगसाठी यावेळी चाहत्यांना चांगलाच पाईंट सापडलाय. फोटोत सुष्मिताने गॉगल लावला आहे.या गॉगलच्या लेन्समध्ये समोर असलेल्या बाटल्यांचे प्रतिबिंब दिसतंय.कारमध्ये ठेवलेल्या बाटल्या गॉगलच्या लेन्समध्ये दिसत असल्यामुळेअनेकांनी या वोडकाच्या बाटल्या आहे की काय ? तुमच्या कारमध्ये दोन शॅम्पेनच्या बाटल्या आहेत का ? असा प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. काहींनी तर सुष्मिताच्या गॉगलचा स्क्रीनशॉट काढून शेअर देखील केला आहे.यावरुनच नेटीझन्सचे किती बारकाईने सेलिब्रेटींवर लक्ष असतं हीच बाब यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित होते. 

Web Title: Sushmita sen Brutally Trolled After She Shares Her Happy Photo