सुश्मिताच्या लेकीसाठी रोहमनने लिहिली भावूक नोट, शेअर केला परफेक्ट फॅमिली फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 12:06 IST2019-08-30T12:04:57+5:302019-08-30T12:06:21+5:30

सुश्मिता सेन अद्याप अविवाहित आहे. पण दोन मुलींची आई आहे. सुश्मिताची लहान मुलगी अलीशा गत 28 ऑगस्टला 10 वर्षांची झाली. सुशने एक भावूक पोस्ट लिहून अलीशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. सुश्मिताचा बॉयफ्रेन्ड रोमहन शॉलही मागे नव्हता.

sushmita sen boyfriend rohman shawl pens sweet note for alisah on 10th birthday |  सुश्मिताच्या लेकीसाठी रोहमनने लिहिली भावूक नोट, शेअर केला परफेक्ट फॅमिली फोटो

 सुश्मिताच्या लेकीसाठी रोहमनने लिहिली भावूक नोट, शेअर केला परफेक्ट फॅमिली फोटो

ठळक मुद्दे काही महिन्याआधी सुश्मिता आणि रोहमनने सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची कबुली केली होती.

सुश्मिता सेन अद्याप अविवाहित आहे. पण दोन मुलींची आई आहे. सुश्मिताची लहान मुलगी अलीशा गत 28 ऑगस्टला 10 वर्षांची झाली. सुशने एक भावूक पोस्ट लिहून अलीशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. सुश्मिताचा बॉयफ्रेन्ड रोमहन शॉलही मागे नव्हता. त्यानेही अलीशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक परफेक्ट फॅमिली फोटो शेअर केला. ‘माझी प्रिय अलीशा, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. गबडू, शेवटी तू दोन अंकांच्या वयात आलीच. माझी समजुदार लेक, देवाने दिलेली एक अनमोल भेट. टिन्गा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. नेहमी चमकत राहा,’ असे रोहमनने लिहिले.


सुश्मिताने अलीशाला 2010 मध्ये दत्तक घेतले होते. यानंतर सुशने चित्रपटांमधून ब्रेक घेतला होता. मला अलीशाला मोठे होताना बघायचे होते. यातला एकही क्षण मला गमवायचा नव्हता, असे सुशने एका मुलाखतीत सांगितले होते.


गेल्या काही महिन्यांपासून सुश्मिता रोहमन शॉलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. सुशच्या दोन्ही मुली अलिशा व रेनी यांनी सुद्धा रोहमनला स्वीकारले आहे. रोहमन व मुलींसोबतचे अनेक फोटो सुश सोशल मीडियावर शेअर करत असते.  मध्यंतरी दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या मध्यंतरी ब-याच गाजल्या होत्या. पण काहीच दिवसांत सुश आणि रोहमन  ब्रेकअपच्या बातम्या खोट्या ठरवत थेट व्हॅकेशनवर पोहोचले होते.  

यावर्षी अखेरिस म्हणजे डिसेंबर महिन्यात हे कपल लग्न करू शकते, अशी सध्या चर्चा आहे. चर्चा खरी मानाल तर, रोहमनने कधीच सुश्मिताला लग्नासाठी प्रपोज केले आहे आणि सुशनेही त्याचा लग्नाचा प्रस्ताव मान्य केला आहे. काही महिन्याआधी सुश्मिता आणि रोहमनने सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची कबुली केली होती. सुश्मिता सेन बराच काळ सिनेमाच्या पडद्यापासून लांब आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘नो प्रॉब्लम’ नंतर ती सिनेमात दिसलीच नाही. मात्र, रोहमनशी असलेल्या मैत्रीमुळे ती सतत चर्चेत असते.  

Web Title: sushmita sen boyfriend rohman shawl pens sweet note for alisah on 10th birthday