Video : लाइव्ह सेशनमध्ये चाहत्याने सुष्मिता सेनला विचारलं लग्नाबद्दल, त्यावर बॉयफ्रेंड रोहमन शॉलनं दिलं 'हे' उत्तर

By गीतांजली | Updated: October 15, 2020 15:34 IST2020-10-15T15:11:49+5:302020-10-15T15:34:18+5:30

सुष्मिताने बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत लाइव्ह सेशन केले.

Sushmita sen and rohman shawl reveal when they are getting married watch video online | Video : लाइव्ह सेशनमध्ये चाहत्याने सुष्मिता सेनला विचारलं लग्नाबद्दल, त्यावर बॉयफ्रेंड रोहमन शॉलनं दिलं 'हे' उत्तर

Video : लाइव्ह सेशनमध्ये चाहत्याने सुष्मिता सेनला विचारलं लग्नाबद्दल, त्यावर बॉयफ्रेंड रोहमन शॉलनं दिलं 'हे' उत्तर

अभिनेत्री सुष्मिता सेनने आपल्या करिअरमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून सुष्मिता बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबतच्या रिलेशनशीपला घेऊन चर्चेत असते. सुष्मिता सेन सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिचे आणि फॅमिलीचे फोटो सतत शेअर करत असते. सुष्मिताने बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत लाइव्ह सेशन केले. याच दरम्यान एकाय यूजरने सुष्मिताला विचारले ती लग्न कधी करणार आहे. 

सुष्मिताने  गुरुवारी (आज) इन्स्टाग्रामवर एका लाईव्ह सेशनच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. या लाईव्ह सेशन दरम्यान तिच्यासोबत बॉयफ्रेंड रोहमन शॉलसुद्धा होता. व्हिडिओमध्ये ती म्हणते, ''मला या सुंदर व्यक्तीची साथ मिळाली आहे.'' या दरम्यान दोघे खूप खुश दिसतायेत. एक चाहत्याने तिच्या लग्नाला घेऊन प्रश्न विचारला.  सुष्मिताला विचारण्यात आले, ''तू लग्न कधी करते आहे?,'' हा प्रश्न एकून सुष्मिता हसू लागली आणि तिने हाच प्रश्न बॉयफ्रेंडला विचारला. आपण लग्न कधी करतोय?, रोहमन यावर म्हणाला, विचारुन सांगतो. आता दोघे २०२१ मध्ये लग्न करणार अशी चर्चा आहे. 

 

रोहमन आणि सुष्मिताच्या मुलींचं बॉन्डींगही सोशल मीडियातील फोटोतून आणि व्हिडीओतून बघायला मिळतं. सुष्मिताच्या कामाबाबत सांगायचं तर मोठ्या ब्रेकनंतर तिने स्क्रीनवर रिन्ट्री घेतली आहे. आर्यातील तिच्या कामाचं प्रेक्षकांकडून कौतुक केलं जातंय.

Web Title: Sushmita sen and rohman shawl reveal when they are getting married watch video online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.