सुशांतचं कुटुंब रियाविरुद्ध साक्ष देण्यासाठी टाकताहेत दबाव, मित्राने केला गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 13:50 IST2020-07-31T13:49:33+5:302020-07-31T13:50:02+5:30

सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाच्या विरोधात त्याच्याच मित्राने गंभीर आरोप केले आहेत.

Sushant's family pressures him to testify against Riya, friend makes serious allegations | सुशांतचं कुटुंब रियाविरुद्ध साक्ष देण्यासाठी टाकताहेत दबाव, मित्राने केला गंभीर आरोप

सुशांतचं कुटुंब रियाविरुद्ध साक्ष देण्यासाठी टाकताहेत दबाव, मित्राने केला गंभीर आरोप

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी त्याच्या वडिलांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आता त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे व त्याची बहिण मीतू सिंग हिने रियाच्या विरोधात काही खुलासे केले आहेत. याआधी रियाने सुशांतच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप खोटे असल्याचे म्हटले होते. तर आता सुशांतचे कुटुंब रियाविरुद्ध स्टेटमेंट देण्यासाठी दबाव टाकत असल्याचे त्याच्या मित्राचे म्हणणे आहे.

आजतकच्या रिपोर्टनुसार, सुशांत सिंग राजपूत याचा मित्र सिद्धार्थ पठानी याने वांद्रे पोलिसांना एक ईमेल केला आहे. त्यात सुशांतचे कुटुंबीय आपल्यावर रियाविरुद्ध खोटी जबानी देण्यासाठी दबाव टाकत असल्याचे म्हटले आहे. हा ईमेल वांद्रे पोलिसांना 28 जुलै रोजी मिळाला आहे.

ईमेलमध्ये नमूद केल्यानुसार, सिद्धार्थला 22 जुलै रोजी एक कॉन्फरन्स कॉल आला होता. त्यात सुशांतचे मेहुणे, आयपीएस अधिकारी ओ. पी. सिंह, मीतू सिंग आणि एक चौथी व्यक्तीही होती. या कॉलमध्ये सिद्धार्थला सुशांतसोबत माऊंट ब्लँक सोसायटीत एका घरात राहत असताना रिया आणि सुशांत यांच्या खर्चांविषयी विचारणा करण्यात आली. हा कॉल 40 सेकंदात कट करण्यात आला आणि त्याची कोणतेही स्टेटमेंट नोंदवण्यात आले नाही, असे सिद्धार्थचे म्हणणे आहे.


त्यानंतर 27 जुलै रोजी सिद्धार्थला पुन्हा ओ.पी. सिंह याचा फोन आला. त्यांनी सिद्धार्थला बिहार पोलिसांना रियाविरुद्ध खोटी साक्ष देण्याविषयी सांगितले. तसेच त्याला पुन्हा एक कॉल आला. तो कॉल नीलोप्तल मृणाल नावाच्या व्यक्तीचा होता. ही व्यक्ती तीच आहे, जी बिहार पोलिसांसोबत दिसली होती. माझ्यावर अशा काही घटनांविषयी सांगण्यास दबाव आणला जात आहे, ज्याविषयी मला काहीच माहीत नाही, असे सिद्धार्थने ईमेलमध्ये म्हटले आहे.

Web Title: Sushant's family pressures him to testify against Riya, friend makes serious allegations