सुशांतसिंग राजपूतच्या बहिणीने जेव्हा तिच्या 5 वर्षांच्या मुलाला सांगितले, त्याचा मामा या जगात नाही, त्यावर तो म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 14:33 IST2020-06-17T14:31:36+5:302020-06-17T14:33:10+5:30

सुशांतची बहीण श्वेता सिंग किर्ती अमेरिकेत राहते भावाच्या निधनामुळे तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Sushant singh rajputs nephew made a heart touching statement | सुशांतसिंग राजपूतच्या बहिणीने जेव्हा तिच्या 5 वर्षांच्या मुलाला सांगितले, त्याचा मामा या जगात नाही, त्यावर तो म्हणाला...

सुशांतसिंग राजपूतच्या बहिणीने जेव्हा तिच्या 5 वर्षांच्या मुलाला सांगितले, त्याचा मामा या जगात नाही, त्यावर तो म्हणाला...

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाचे वृत्त ऐकून अनेकांना धक्का बसला. त्याच्या निधनानंतर बॉलिवूड व त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. सुशांतच्या निधनानंतर लाखो लोकांनी त्याला सोशल मीडियावरुन श्रद्धांजली वाहिली आहे. 
त्याच्या कुटुंबीयांना अजूनही यावर विश्वास ठेवणे कठीण जातेय की सुशांत यापुढे जगात नसणार आहे. सुशांतची बहीण श्वेता सिंग किर्ती अमेरिकेत राहते भावाच्या निधनामुळे तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

https://www.facebook.com/sskirti/posts/10158108759596253

श्वेताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने  आपल्या मुलासोबतचे संभाषण पोस्ट केले आहे. श्वेता लिहिते, जेव्हा मी माझ्या मुलाला निर्वाणाला सांगितले की त्याचा मामा आता या जगात  नाही, तेव्हा त्याने मला सांगितले की, तो तुझ्या हृदयात जिवंत आहे. त्याने हे मला एकदा नव्हे तर तीनदा सांगितले. जेव्हा पाच वर्षांचे मुलगा असे बोलते तेव्हा हे आपल्या सर्वांना किती कणखर व्हायले हवे हे कळते. सुशांतच्या चाहत्यांनी कृपया समजून घ्या की सुशांत अजूनही आपल्या सर्वांच्या हृदयात तो आहे आणि कायम राहील. 


 
सुशांत सिंग राजपूत जगातून गेला पण जातांना अनेक प्रश्न मागे सोडून गेला. त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये नव्या वादाला तोंड फोडले आहे. या वादावरून बिहारच्या न्यायालयामध्ये एका वकीलाने बॉलिवूडमधील मोठमोठे अभिनेते, दिग्दर्शकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. दिग्दर्शक करण जोहर, संजय लीला भन्साळी, एकता कपूर आणि अभिनेता सलमान खान यांच्यासह ८ जणांविरोधात मुझफ्फरपूरच्या न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. या सर्वांवर सुशांत सिंगला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी आयपीसी 306, 109, 504 आणि 506 कलमांन्वये तक्रार दाखल करण्यात आल्याचे ओझा यांनी सांगितले.

Web Title: Sushant singh rajputs nephew made a heart touching statement