अखेर 'दिल बेचारा' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, सुशांतसिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा, झलक पाहून टचकन येईल तुमच्याही डोळ्यात पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 11:40 IST2020-07-06T11:28:27+5:302020-07-06T11:40:04+5:30

'दिल बेचारा' या सिनेमाची कथा विनोद आणि रोमान्स भोवती फिरताना चाहत्यांना अनुभवता येणार आहे. शिवाय २०१२ साली प्रकाशित झालेल्या जॉन ग्रीन यांच्या 'द फॉल्ट इन अवर स्टार्स' कादंबरीवर सिनेमाची कथा  आधारित आहे.

Sushant Singh Rajput's last movie 'Dil Bechara's trailer is released, most emotional moment on internet today | अखेर 'दिल बेचारा' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, सुशांतसिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा, झलक पाहून टचकन येईल तुमच्याही डोळ्यात पाणी

अखेर 'दिल बेचारा' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, सुशांतसिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा, झलक पाहून टचकन येईल तुमच्याही डोळ्यात पाणी

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर  'दिल बेचारा' सिनेमाची चाहते वाट पाहात होते. सुशांतचा हा शेवटचा सिनेमा असल्यामुळे हा सिनेमा पाहण्यासाठी सारेच उत्सुक असणार हे मात्र नक्की. अखेर बहुचर्चित  'दिल बेचारा'  सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहताना सुशांतच्या आठवणीने तुमचेही डोळ्यात पाणी येईल हे मात्र नक्की. सध्या हा सिनेमा 24 जुलै रोजी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. मात्र सुशांतचा शेवटचा सिनेमा असल्यामुळे थिएटरमध्येच तो प्रदर्शित व्हावा अशी चाहते मागणी करत आहे. मुकेश छाबड़ाने हा सिनेमा दिग्दर्शित केला असून अभिनेत्री संजना सांघी त्याच्याबरोबर झळकणार आहे. 


या सिनेमाची कथा विनोद आणि रोमान्स भोवती फिरताना चाहत्यांना अनुभवता येणार आहे. शिवाय २०१२ साली प्रकाशित झालेल्या जॉन ग्रीन यांच्या 'द फॉल्ट इन अवर स्टार्स' कादंबरीवर सिनेमाची कथा  आधारित आहे. ट्रेलर पाहून सुशांत भविष्याचा सुपरस्टार बनू शकला असता असेच मनाला वाटत राहते. या सिनेमातूनही सुशांत कधी हसवेल, रडवेल, तर कधी भावनिक करेल तर कधी रसिकांचं तुफान मनोरंजनही करेल.

नेहमीप्रमाणे सुशांतच्या अभिनयात एक वेगळीच सहजता पाहायला मिळते.  रसिकांना खळखळून हसवणं आणि हसता हसता रसिकांच्या डोळ्यात टचकन पाणी आणण्याची किमया सुशांतसारखा समर्थ अभिनेताच करु शकतो. चेहऱ्यावरील हावभाव आणि रुपेरी पडद्यावरील त्याचा सहजसुंदर वावर रसिकांना मोहून टाकतो. सुशांतच्या याच अभिनयाची झलक त्याच्या 'दिल बेचारा' या सिनेमातही पाहायला मिळते. सुशांतचा हा शेवटचा सिनेमा रसिकांना पाहताय येणार असल्यामुळे कायम स्मरणात राहणारा हा सिनेमा ठरेल हे मात्र नक्की. सुशात आज नसला तरी त्याच्या अभिनयातून रसिकांच्या मनात त्याचे एक वेगळेच स्थान राहणार हे मात्र नक्की.  

Web Title: Sushant Singh Rajput's last movie 'Dil Bechara's trailer is released, most emotional moment on internet today