सुशांत सिंग राजपूतची अधुरी ही कहाणी ...! चाहत्यांसोबत शेअर केली होती 50 स्वप्नांची डायरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 11:11 IST2020-06-15T10:56:22+5:302020-06-15T11:11:10+5:30

कायमचीच अधुरी राहिलीत सुशांतची ही स्वप्नं... अशीही काही स्वप्नं आहेत, जी आता कधीच पूर्ण होऊ शकणार नाहीत.

Sushant Singh Rajput’s Had Shared A List Of ’50 Dreams’ With His Fans And It’s Getting Viral | सुशांत सिंग राजपूतची अधुरी ही कहाणी ...! चाहत्यांसोबत शेअर केली होती 50 स्वप्नांची डायरी

सुशांत सिंग राजपूतची अधुरी ही कहाणी ...! चाहत्यांसोबत शेअर केली होती 50 स्वप्नांची डायरी

सुशात सिंग राजपूतने काल गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या अकाली जाण्याने बॉलिवूडसह त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करत सुशांतने फार कमी वेळात मोठी लोकप्रियता मिळवली होती. अनेक स्वप्नही पाहिली होती. ही स्वप्न पूर्ण करण्याआधीच सुशांतने अकाली एक्झिट घेतली.

सुशांत सिंह राजपूतने आपल्या या स्वप्नांची यादी बनवून ठेवली होती.
2019 मध्ये सुशांतने चाहत्यांसोबत त्याच्या 50 स्वप्नांची यादी शेअर केली होती. त्याची ही यादी बघून सुशांत किती महत्त्वाकांक्षी होता, हे कळते़ सोशल मीडियावर तो प्रचंड अ‍ॅक्टिव्ह होता.


My 50 dreams & counting!  सुशांतने पाहिलेल्या स्वप्नांची यादी

My 50 DREAMS & counting... अशा शीर्षकाखाली सुशांतने सोशल मीडियावर त्याच्या 50 स्वप्नांची यादी शेअर केली होती.

1.  विमान उडवायला शिकणे
2. आयर्न मॅन ट्रिथॉनसाठी (स्विमींग, सायकलिंग व रनिंग)चे ट्रेनिंग
3. डाव्या हाताने क्रिकेट खेळणे
4. मोर्स कोड शिकणे (टेलिकम्युनिकेशनची भाषा)
5. अंतराळाबद्दल शिकण्यात मुलांना मदत करणे
6. चॅम्पियनसोबत टेनिस खेळणे
7. फोर क्लॅप्स पुश अप


8. एक आठवड्यापर्यंत चंद्र, मंगळ, गुरु, शनि या ग्रहांना त्यांच्या कक्षेत फिरतांना मॉनिटर करणे
9. ब्लू होलमध्ये डुबकी मारणे
10. डबल स्लिट एक्सपेरिमेंट एकदा पाहणे
11. 1000 झाडे लावणे
12. दिल्ली इंजिनिअरिंग कॉलेजच्या होस्टेलमध्ये एक संध्याकाळ 
13. 100 मुलांना इस्रोमध्ये वर्कशॉपसाठी पाठवणे
14. कैलाश पर्वतावर ध्यान

15. चॅम्पियनसोबत पोकर खेळणे
16. पुस्तक लिहिणे
17. सर्नच्या लॅबला भेट देण 
18.  ध्रुवीय प्रकाशाचं चित्र काढणे
19. नासाचे आणखी एका वर्कशॉपमध्ये सहभागी होणे
20. सहा महिन्यांत 6 पॅक्ड अब्स्ज
21. सेनोटेसमध्ये पोहणे
22. दृष्टिहिनांसाठीची कोड लँग्वेज शिकणे
23. जंगलात एक आठवडा घालवणे
24. वैदिक ज्योतिष्यशास्त्र शिकणे
25. डिस्ज्नीलँड पाहणे

26. लिगोची लॅब पाहणे  
27. एक घोडा पाळणे
28.10 डान्स फॉर्म शिकणे
29.  फ्री एज्युकेशनसाठी काम करणे
30. पॉवरफुल टेलिस्कोपमधून एंड्रोमेडा गॅलेक्सीला न्याहाळणे
31. क्रिया योगा शिकणे
32. अंटार्क्टिका खंड फिरायला जाणे
33.  महिलांना सेल्फ डिफेन्स शिकवणे
34.  जिवंत ज्वालामुखीत शूटींग करणे


35. शेती करणे
36. मुलांना डान्स शिकवणे
37.  दोन्ही हातांनी एक समान धनुर्विद्या शिकणे
38. रेसनिक हेलिडेची फिजिक्सवरची सगळी पुस्तके वाचणे
39.  पॉलिनेसियन अ‍ॅस्ट्रोनॉमी शिकणे
40. गिटारवर50 आवडती गाणी शिकणे
41.  चॅम्पियनसोबत चेस खेळणे
42. स्वत:ची लॅम्बर्गिनी खरेदी करणे

43. व्हिएन्नामधील सेंट स्टिफन कॅथेड्रेलला भेट
44. व्हिजिबल साऊंड व व्हायब्रेशनचा प्रयोग करणे   
45. इंडियन डिफेन्स फोर्ससाठी मुलांना तयार करणे
46. विवेकानंदांवर डॉक्युमेंट्री बनवणे
47. सर्फ लर्निंग
48. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर काम करणे
49. ब्राझिलचा डान्स व मार्शल आर्ट शिकणे
50.  ट्रेनमध्ये बसून युरोपचा प्रवास करणे

Web Title: Sushant Singh Rajput’s Had Shared A List Of ’50 Dreams’ With His Fans And It’s Getting Viral