सुशांतच्या आत्महत्येनंतर काही क्षणात अंकिता लोखंडेने का डिलीट केली ती पोस्ट? चाहत्यांचे हजारो सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 13:28 IST2020-06-15T13:27:11+5:302020-06-15T13:28:38+5:30

 सुशांतच्या निधनाच्या काही तास आधी अंकिताने ही पोस्ट तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केली होती. पण सुशांतच्या मृत्यूनंतर लगेच तिने ही पोस्ट डिलीट केली. 

Sushant singh rajputs ex-girlfriend ankita lokhandes deleted post going viral on the social media | सुशांतच्या आत्महत्येनंतर काही क्षणात अंकिता लोखंडेने का डिलीट केली ती पोस्ट? चाहत्यांचे हजारो सवाल

सुशांतच्या आत्महत्येनंतर काही क्षणात अंकिता लोखंडेने का डिलीट केली ती पोस्ट? चाहत्यांचे हजारो सवाल

ठळक मुद्देसुशांत सिंग राजपूत व अंकिता लोखंडे अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.

रविवारी दुपारच्या सुमारास अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्याची बातमी आली आणि सगळेच सुन्न झालेत. सुशांतचा मृत्यू अनेकांना चटका लावून गेला. सुशांतने आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण याचदरम्यान सुशांतची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडेची एक पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय. सुशांतच्या निधनाच्या काही तास आधी अंकिताने ही पोस्ट तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केली होती. पण सुशांतच्या मृत्यूनंतर लगेच तिने ही पोस्ट डिलीट केली. तिने ही पोस्ट का डिलीट केली, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नेटकरी यावरून अंकिताला अनेक प्रश्न विचारत आहेत.


काय होती अंकिताची पोस्ट
देव काही लोकांना आपल्या आयुष्यातून काढून टाकतो. कारण देवाने त्या गोष्टी ऐकल्या असतात ज्या हे लोकांनी ऐकलेल्या नसतात..., अशी पोस्ट अंकिताने केली होती. मात्र काही तासानंतर अंकिताने ही पोस्ट डिलीट केली. अर्थात तोपर्यंत या पोस्टचे स्क्रिनशॉट्स व्हायरल झाले. तिच्या या पोस्टवरून लोकांनी अनेक तर्कवितर्क काढणे सुरु केले आहे. कदाचित सुशांतने अखेरच्या वेळी अंकिताशी बोलण्याचा प्रयत्न केला असावा, अशी शंका लोकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान सुशांतच्या आत्महत्येने अंकिताला मोठा धक्का बसला आहे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत अंकिताच्या भावाची भूमिका साकारणारा अभिनेता पराग त्यागीने दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या आत्महत्येने अंकिता शॉक्ड आहे. तिला स्वत:ला सांभाळणे कठीण जातेय.

अनेक वर्षे होते अफेअर
सुशांत सिंग राजपूत व अंकिता लोखंडे अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत दोघांनी एकत्र काम केले होते. याच मालिकेच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम फुलले होते. यानंतर दोघेही अनेक वर्षे लिव्हइनमध्येही राहिलेत. मात्र दोघेही लग्न करणार असे वाटत असतानाच त्यांचे ब्रेकअप झाले होते.

Web Title: Sushant singh rajputs ex-girlfriend ankita lokhandes deleted post going viral on the social media