Suicide or Murder : सुशांत नाही, सुशांतचा ‘डुप्लिकेट’ घेतोय बॉलिवूडमध्ये एन्ट्री! पोस्टरही झाले रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 05:23 PM2020-07-20T17:23:46+5:302020-07-20T17:24:42+5:30

सुशांतच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर एक सिनेमा येत्या काळात आपल्या भेटीला येणार आहे.

sushant singh rajput suicide case tiktoker sachin tiwari to play lead role in suicide or murder film | Suicide or Murder : सुशांत नाही, सुशांतचा ‘डुप्लिकेट’ घेतोय बॉलिवूडमध्ये एन्ट्री! पोस्टरही झाले रिलीज

Suicide or Murder : सुशांत नाही, सुशांतचा ‘डुप्लिकेट’ घेतोय बॉलिवूडमध्ये एन्ट्री! पोस्टरही झाले रिलीज

googlenewsNext
ठळक मुद्देसचिन बराचसा सुशांतसारखा दिसतो. त्याचा लूक, त्याची स्टाईल सेम टू सेम सुशांतसारखी आहे.

सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूच्या धक्क्यातून आजही चाहते सावरलेले नाहीत. सुशांतने डिप्रेशनमध्ये आत्महत्या केली असे सांगितले जातेय. मात्र काहींच्या मते, सुशांतची आत्महत्या नसून हत्या आहे. अनेकांनी यासंदर्भात सीबीआय  चौकशी मागणी लावून धरली आहे. आता ही चौकशी होईल की नाही ते माहित नाही. पण हो, सुशांतच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर एक सिनेमा मात्र येत्या काळात आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे, या सिनेमात सुशांतसारख्याच हुबेहुब दिसणा-या एक टिकटॉक स्टारची वर्णी लागली आहे.

होय,  टिकटॉक स्टार सचिन तिवारी याची ‘सुसाइड ऑर मर्डर’ या आगामी सिनेमासाठी निवड करण्यात आली आहे.  या सिनेमाचे पोस्टरही रिलीज झालेय.  विजय शेखर गुप्ता हा सिनेमा बनवत आहेत. येत्या सप्टेंबरमध्ये या सिनेमाचे शूटींग सुरु होईल आणि यावर्षी नाताळच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज केला जाईल. या सिनेमात इंडस्ट्रीच्या बाहेरून आलेल्या एका कलाकाराची कहाणी दाखवण्यात येणार आहे.  


 हा सिनेमा सुशांत सिंग राजपूतचा बायोपिक नसून सुशांतच्या जीवनप्रवासाने प्रेरित झालेला सिनेमा असेल. यामुळे सिनेसृष्टीचे खरे रुप लोकांसमोर येईल, असे विजय शेखर गुप्ता यांनी सांगितले.

कोण आहे सचिन तिवारी
सचिन बराचसा सुशांतसारखा दिसतो. त्याचा लूक, त्याची स्टाईल सेम टू सेम सुशांतसारखी आहे. सुशांत या जगात नाही. पण सुशांतसारखा दिसणा-या सचिनला पाहून  अनेक लोक कमेंट करत आहेत. काहींनी तर त्याला सुशांतच्या वडिलांना भेटण्याचा सल्लाही दिला आहे. सचिन हा इन्स्टाग्रामवर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टावर त्याचे 10 हजारांवर फॉलोअर्स आहेत.  सचिन मुळचा उ. प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील देवानंदपूर या गावातला. 12 वी पर्यंत शिकलेला सचिन क्रिकेटचा शौकीन आहे. मार्शल आर्ट्सचे ट्रेनिंगही त्याने घेतले आहे. अ‍ॅक्टिंमध्येही त्याला रस आहे. सुशांतसारखा दिसणारा सचिन टिकटॉकवर प्रचंड लोकप्रिय होता.  

Web Title: sushant singh rajput suicide case tiktoker sachin tiwari to play lead role in suicide or murder film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.