याला म्हणतात ‘रंग में भंग’...; ‘लिव्ह इन’साठी सुशांतचा खटाटोप!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 08:00 IST2020-01-21T08:00:00+5:302020-01-21T08:00:06+5:30

लिव्ह इनमध्ये नवे विघ्न...

sushant singh rajput rhea chakraborty searching for new place to live together | याला म्हणतात ‘रंग में भंग’...; ‘लिव्ह इन’साठी सुशांतचा खटाटोप!!

याला म्हणतात ‘रंग में भंग’...; ‘लिव्ह इन’साठी सुशांतचा खटाटोप!!

ठळक मुद्देरियापूर्वी सुशांत अंकिता लोखंडेसोबत रिलेशनशिपमध्ये होता

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. सर्वप्रथम अंकिता लोखंडे, मग क्रिती सॅनन, सारा अली खान. सध्या सुशांत अभिनेत्री रिया चक्रवर्तीला डेट करत असल्याची चर्चा आहे. आताश: हे नाते बरेच पुढे गेले आहे. अगदी लिव्ह-इनमध्ये एकत्र राहण्यापर्यंत. गेल्या काही दिवसांपासून सुशांत रियासोबत तिच्या घरी राहतोय. पण आता सुशांतला नवे घर शोधावे लागणार आहे.
होय, सुशांतमुळे रियाला अडचणींचा सामना करावा लागतोय. रिया ज्याठिकाणी राहते, त्या फ्लॅटच्या मालकाला रियाने अन्य कुणासोबत  फ्लॅट शेअर करण्यावर आक्षेप आहे. अपार्टमेंटच्या नियमानुसार, या फ्लॅटमध्ये केवळ एक व्यक्ती राहू शकते. अशात रिया व सुशांतला एकत्र एकाच फ्लॅटमध्ये राहणे कठीण जातेय. त्यामुळे, या कपलने नव्या घराचा शोध सुरु केला आहे. 

सुशांत आधी एकटा एका फ्लॅटमध्ये राहत होता.  चर्चा खरी मानाल तर शेजा-यांच्या तक्रारीनंतर घरमालकाने सुशांतला फ्लॅट खाली करण्यास सांगितले होते. सुशांत रात्री उशीरापर्यंत पार्ट्या करायचा. लाऊड म्युझिकमुळे त्याचे शेजारी कंटाळले होते. अखेर घरमालकाने तंबी दिली आणि सुशांतला घर खाली करावे लागले होते. यानंतर तो रियासोबत तिच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला होता.

रियापूर्वी सुशांत अंकिता लोखंडेसोबत रिलेशनशिपमध्ये होता. या दोघांचे रिलेशनशिप अगदी लग्नापर्यंत पोहोचले होते. पण अनेक वर्षे सोबत राहिल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर सुशांत व क्रिती सॅननच्या रोमान्सच्या चर्चा रंगल्या.

क्रितीमुळे सुशांत व अंकिताचे ब्रेकअप झाले, असेही म्हटले गेले. पण कालांतराने हे नातेही संपले. आता सुशांत रियाच्या प्रेमात वेडा झाला आहे. त्याचे हे नाते किती यशस्वी होते, ते पाहणे आता इंटरेस्टिंग असणार आहे.

Web Title: sushant singh rajput rhea chakraborty searching for new place to live together