सुशांतला मारण्यासाठी स्टन गनचा वापर; अमेरिकेतील डॉक्टरचा खळबळजनक दावा !!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 11:43 AM2020-08-13T11:43:09+5:302020-08-13T11:52:54+5:30

म्हणून बंद झाला नव्हता सुशांतचा एक डोळा; नवा खुलासा, सुशांत प्रकरणाला नवे वळण!!

sushant singh rajput may have been killed using a stun gun subramanian swamy demanded nia probe | सुशांतला मारण्यासाठी स्टन गनचा वापर; अमेरिकेतील डॉक्टरचा खळबळजनक दावा !!

सुशांतला मारण्यासाठी स्टन गनचा वापर; अमेरिकेतील डॉक्टरचा खळबळजनक दावा !!

googlenewsNext
ठळक मुद्देसुशांतच्या हत्येसाठी स्टन गनचा वापर झाल्याच्या थ्योरीचा सुब्रमण्यम स्वामी यांनीही पाठींबा दर्शवला.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी रोज नवे खुलासे होत असताना आता एक धक्कादायक दावा केला जात आहे. होय, सुशांतची हत्या स्टन गनने केली गेली, असा नवा आणि खळबळजनक दावा एका फॉलोअरने केला आहे. विशेष म्हणजे, भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही या ‘थ्योरी’ला पाठींबा दिला आहे.

म्हणून बंद झाला नव्हता सुशांतचा एक डोळा!!
अमेरिकेत इंटरर्नल मेडिसीन डॉक्टर असल्याचा दावा करणारे राजू बाधवा यांनी यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले, ‘सुशांत प्रकरणात स्टन गनचा वापर झाला आहे. यामुळे त्याच्या मानेवर डाव्या बाजूला भाजल्याच्या खुणा होत्या. तुम्ही काळजीपूर्वक बघितल्यास सुशांतचा अर्धा चेहरा पॅरेलाइज्ड दिसत होता. याला बेल्स पाल्सी म्हणतात आणि हे हाय व्होल्टेजमुळे घडते. यामुळे सुशांतच्या चेहºयाचा डावा भाग पॅरालाइज्ड होता आणि डावा डोळा उघडा होता. चेह-याच्या नसा (7th cranial nerve) आणि शॉक यामुळे सुशांतचा एक डोळा उघडा राहिला होता. अमेरिकेत एका नेव्ही सील अधिका-यांला मारण्यासाठी सुद्धा अशाच स्टन गनचा वापर झाला होता आणि त्याने आत्महत्या केलीय, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मारेकºयांचा पर्दाफाश झाला होता, ’ असे बाधवा यांनी लिहिले आहे.

सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, 

सुशांतच्या हत्येसाठी स्टन गनचा वापर झाल्याच्या थ्योरीचा सुब्रमण्यम स्वामी यांनीही पाठींबा दर्शवला. ‘ही गन अरबी समुद्राच्या सीमेलगतच्या कुठल्या देशातून पाठवली गेली होती काय? एनआयएने याचा तपास करायला हवा,’ असे टिष्ट्वट स्वामींनी केले.

Web Title: sushant singh rajput may have been killed using a stun gun subramanian swamy demanded nia probe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.