Sushant Singh Rajput Love Life: अंकिता लोखंडेपासून रिया चक्रवर्तीपर्यंत, जाणून घ्या सुशांत सिंग राजपूतच्या लव्ह लाइफबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 13:05 IST2021-06-14T13:04:28+5:302021-06-14T13:05:01+5:30

१४ जून २०२० रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

Sushant Singh Rajput Love Life: From Ankita Lokhande to Riya Chakraborty, Learn About Sushant Singh Rajput's Love Life | Sushant Singh Rajput Love Life: अंकिता लोखंडेपासून रिया चक्रवर्तीपर्यंत, जाणून घ्या सुशांत सिंग राजपूतच्या लव्ह लाइफबद्दल

Sushant Singh Rajput Love Life: अंकिता लोखंडेपासून रिया चक्रवर्तीपर्यंत, जाणून घ्या सुशांत सिंग राजपूतच्या लव्ह लाइफबद्दल

बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत असा अभिनेता आहे ज्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले होते. त्याने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनात घर बनविले होते. मात्र १४ जून, २०२० रोजी त्याने टोकाचा निर्णय घेऊन स्वतःला संपवून आपल्या चाहत्यांना दुःखी केला. आजही त्याचे चाहते या धक्क्यातून सावरलेले नाही. सुशांतने त्याच्या करिअरची सुरूवात टेलिव्हिजनवरून केली होती. खरेतर त्याने किस दिश में है मेरा दिल या मालिकेतून करिअरची सुरूवात केली होती. मात्र त्याला खरी ओळख मिळाली होती पवित्र रिश्ता मालिकेतून.


पवित्र रिश्ता मालिकेतील सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडेची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती आणि या जोडीला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. दोघांचे स्वभाव वेगळे होते आणि सुरूवातीला एकमेकांच्या जास्त जवळदेखील नव्हते. मात्र काही कालावधीनंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरूवात केली होती. दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचे त्यांनी छोट्या पडद्यावरील रिएलिटी शो झलक दिखला जामध्ये खुलासा केला होता. मात्र जवळपास ६ वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर सुशांत आणि अंकिताने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

अंकिता लोखंडे पासून विभक्त झाल्यानंतर सुशांत क्रिती सनॉनला डेट करू लागला होता. असे सांगितले जाते की दोघे एकमेकांच्या खूप जवळ आहेत आणि रिलेशनशीपमध्ये आहेत. मात्र नंतर क्रितीने हे वृत्त फेटाळून लावले होते आणि दोघे चांगले मित्र असल्याचे म्हटले होते. खरेतर क्रिती आणि सुशांतने राब्ता चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळाले नाही.

त्यानंतर सुशांत सिंग राजपूतचे नाव केदारनाथ फेम अभिनेत्री सारा अली खानसोबत जोडले गेले होते. खरेतर दोघांनी केदारनाथ चित्रपटात एकत्र काम केले आणि या चित्रपटादरम्यान ते जवळ आले होते. दोघांनी याबद्दल असे काही स्पष्ट केले नाही. हे रिलेशनशीप वृत्तांमध्ये अफवा असल्याचे म्हटले गेले होते.

२०१३ साली सुशांत राजपूतची भेट रिया चक्रवर्तीशी झाली होती. सुरूवातीला ते जास्त भेटले नव्हते मात्र काही कालावधीनंतर ते दोघे चांगले मित्र बनले होते. असे सांगितले जाते की, सुशांतने रोहिणी अय्यरच्या पार्टीत रियाकडे प्रेम व्यक्त केले होते. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर रिया सुशांतच्या घरी राहण्यासाठी आली होती. मात्र काही वादामुळे ८ जून, २०२० ला रिया सुशांतचे घर सोडून गेली होती.

त्यानंतर १४ जून, २०२० रोजी सुशांतने त्याच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले होते. त्याच्या निधनानंतर रियावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आणि सुशांत प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर रियाला तुरूंगाची हवादेखील खावी लागली होती.
 

Web Title: Sushant Singh Rajput Love Life: From Ankita Lokhande to Riya Chakraborty, Learn About Sushant Singh Rajput's Love Life