गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसोबत सुशांत सिंग राजपूतचे उडाले होते खटके?, दीर्घकाळापासून होत्या त्यांच्या अफेयरच्या चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 16:58 IST2020-06-14T16:58:18+5:302020-06-14T16:58:42+5:30
सुशांत सिंग राजपूत व रिया सेन बऱ्याच कालावधीपासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. मात्र आता त्यांच्यात खटके उडाले असल्याचं बोललं जातंय.

गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसोबत सुशांत सिंग राजपूतचे उडाले होते खटके?, दीर्घकाळापासून होत्या त्यांच्या अफेयरच्या चर्चा
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूतने वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्ये मागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की सुशांत डिप्रेशनवर उपचार घेत होता.
मागील काही दिवसांपासून सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती एकमेकांच्या खूप जवळ आले होते. बऱ्याच वेळेला ते दोघे एकत्र व्हेकेशन एन्जॉय करतानाही दिसले होते. त्यामुळे ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचीही चर्चा रंगली होती. आता सुशांतच्या आत्महत्येचे वृत्त समोर आल्यानंतर असं सांगितलं जात आहे की रिया व सुशांतच्या नात्यात कटुता आली होती. मात्र सुशांत व रिया यांनी त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत असे काहीच सांगितले नव्हते. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार ते दोघे एकमेकांना डेट करत होते.
एका मुलाखतीत सुशांतसोबत असलेल्या नात्याबद्दल रियाने सांगितले होते की, या वृत्तात तथ्य नाही. सुशांत माझा खूप चांगला मित्र आहे. रियाने हेदेखील सांगितले की, ते दोघे यशराज फिल्म्समध्ये होते तेव्हापासून एकमेकांना ओळखतात. याशिवाय तिचे म्हणणे होते की त्या दोघांचे मॅनेजरदेखील बऱ्याच काळापासून एकच आहे.
याशिवाय रियाने भलेही त्याला मित्र असं सांगितलं असलं तरीदेखील हेही म्हटलं होतं की, मला त्याच्याबद्दल माहित नाही. पण माझ्यासाठी तो सुपरक्यूट आणि अट्रॅक्टिव्ह आहे. पण मला माहित नाही तो माझ्याबद्दल काय विचार करतो.
सुशांत सिंगच्या घरी त्याचे काही मित्रदेखील होते. रात्री तो झोपण्यासाठी त्याच्या खोलीत गेला. पण सकाळी जेव्हा त्याने दरवाजा खोलला नाही आणि उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यांनी खोलीचा दरवाजा तोडला. तेव्हा त्याने गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही.