Sushant Singh Rajput Case: निर्माता संदीप सिंग लंडनला पळून जाण्याच्या तयारीत?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 12:04 PM2020-08-26T12:04:02+5:302020-08-26T12:22:33+5:30

संदीप वेगवेगळ्या विधानांमुळे स्वत: संशयाच्या भोवऱ्यात आला आहे.

Sushant singh rajput good friend producer sandip singh planning to leave india | Sushant Singh Rajput Case: निर्माता संदीप सिंग लंडनला पळून जाण्याच्या तयारीत?

Sushant Singh Rajput Case: निर्माता संदीप सिंग लंडनला पळून जाण्याच्या तयारीत?

googlenewsNext

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर फिल्ममेकर संदीप सिंगने मीडियासमोर येते स्वत:ला अभिनेत्याचा जवळचा मित्र असल्याचे सांगितले होते. संदीप सिंगने हॉस्पिटलपासून ते सुशांतच्या अंतिम संस्कारांपर्यंत सगळी काम केली. पण वेगवेगळ्या विधानांमुळे तो स्वत: संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. आता तो पूर्णपणे बेपत्ता आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्याबद्दल कोणतीही बातमी आलेली नाही.  सुशांतचा फॅमिली फ्रेंडने संदीप सिंग लंडनला पळून जाण्याचा प्लॅन बनवत असल्याचे म्हटले आहे. 

 एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार सुशांतच्या फॅमिली फ्रेंड असलेल्या निलोत्पल मृणालने ट्विट केले आहे की, ''संदीप भारत सोडण्याचा प्लॅन बनवत आहे. या महिन्याच्या अखेरिस लंडनला जाणार आहे. व्हिसा आणि बाकीची कामं पूर्ण झाली आहेत.'' मृणालने पुढे लिहिले, कोणीतरी मला हे पाठविले आहे- एजन्सींना हाय अर्लट केले पाहिजे. या प्रकरणात सामील असलेल्या कोणालाही देशाबाहेर प्रवास करण्याची मुभा दिली जाऊ नये.

 ज्याप्रकारे संदीप सिंगबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत की, संदीप सिंगला कुणी हॉस्पिटलमध्ये पाठवलं होतं का? कारण सुशांतसोबत त्याचं गेल्या १ वर्षांपासून काहीच बोलणं झालं नव्हतं. पण मग का त्याने पुढे येऊन लीड करत होता. तसेच संदीप सिंगचं दुबई कनेक्शनही असल्याचं बोललं जात आहे.

Web Title: Sushant singh rajput good friend producer sandip singh planning to leave india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.