Metoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 17:23 IST2018-10-19T17:18:30+5:302018-10-19T17:23:37+5:30

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आगामी सिनेमा किजी और मैनीमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

sushant singh rajput given his statement on sanjana sanghvi controversy on twitter social media director mukesh chhabra supporting | Metoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स

Metoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स

ठळक मुद्देसुशांतने केले संजनासोबतच्या चॅटचे काही स्क्रीन शॉट्स शेअरदिग्दर्शक मुकेश छाब्राने सुशांतला दिला पाठिंबा

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आगामी सिनेमा 'किजी और मैनी'मुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमात सुशांतसोबत अभिनेत्री संजना सांघवी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. संजनाचा हा पहिलाच सिनेमा असून ती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वी असे वृत्त आले होते की सुशांत सिंग राजपूत संजनाचा मेंटॉर बनला आहे. त्यानंतर अशा बातम्या आल्या की सुशांत व संजना जास्त फ्रेंडली झाले होते आणि मग संजनाला कम्फर्टेबल वाटत नव्हते. त्यानंतर आता सुशांतने याबाबत खुलासा केला आहे.

सुशांत सिंग राजपूतने संजनासोबतच्या चॅटचे काही स्क्रीन शॉट्स ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत. त्याने लिहिले की मी माझी खासगी माहिती कोणासोबत शेअर करत नाही. मात्र माझ्याकडे काही उपाय नाही.



 

सुशांतच्या ट्विटर अकाउंटवरील व्हेरिफिकेशन झाल्यावर येणारे ब्लू टिक गायब आहे. त्यामुळे ते फेक अकाउंट असल्याची चर्चा सुरू होती. मात्र सुशांतने सांगितले की, तो ब्लू टिक बऱ्याच कालावधीपासून नाही. त्यामुळे कोणताही नित्कर्ष काढू नका. 




किजी और मैनी चित्रपटाचे दिग्दर्शक मुकेश छाब्रा सुशांत सिंग राजपूतच्या सपोर्टमध्ये पुढे आले आहेत. सुशांतच्या ट्विटचे उत्तर दिले की, अशी कोणती घटना सेटवर घडलीच नाही. याबद्दल मी आधीच क्लियर केले आहे.



 

Web Title: sushant singh rajput given his statement on sanjana sanghvi controversy on twitter social media director mukesh chhabra supporting