सुशांत आणि अंकिता लोखंडेच्या ब्रेकअपवर सुशांतच्या वडिलांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया म्हणाले- जे घडायचे, ते घडून गेले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 10:58 IST2020-06-26T10:58:00+5:302020-06-26T10:58:29+5:30

सुशांत सिंग राजपूत आपल्या निधनानंतर अनेक प्रश्न मागे सोडून गेला आहे. या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न मुंबई पोलिस करतायेत. ...

Sushant singh rajput father kk singh talks about ankita lokhande | सुशांत आणि अंकिता लोखंडेच्या ब्रेकअपवर सुशांतच्या वडिलांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया म्हणाले- जे घडायचे, ते घडून गेले...

सुशांत आणि अंकिता लोखंडेच्या ब्रेकअपवर सुशांतच्या वडिलांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया म्हणाले- जे घडायचे, ते घडून गेले...

सुशांत सिंग राजपूत आपल्या निधनानंतर अनेक प्रश्न मागे सोडून गेला आहे. या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न मुंबई पोलिस करतायेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर चर्चेत आली ती त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे. सुशांत आणि अंकिताने एकता कपूरच्या पवित्र रिश्ता मालिकेत एकत्र काम केले होते. मानव आणि अर्चनाच्या जोडीला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार सुशांतच्या वडिलांनी मुलाबाबत आणि त्याच्याशी संबंधीत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. सुशांतचे वडिल के के सिंग एका मुलखती दरम्यान म्हणाले, ते सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला भेटले होते. अंकिता फक्त मुंबईतच त्याना भेटायला आली नव्हती तर ती पाटण्याला सुद्धा येऊन त्यांना भेटून गेली होती. रिपोर्टनुसार अंकिता लोखंडे सुशांतच्या आयुष्यातली एकच अशी मुलगी होती जी त्याच्या वडिलांना माहित होती.

केके सिंग यांना सुशांत आणि अंकिताच्या ब्रेकअपबद्दल विचारले असता ते म्हणाले, आता तो केवळ योगायोग आहे, जे घडायचे, ते घडून गेले आहे. पुढे ते म्हणाले, मी सुशांतला लवकर लग्न कर असे सांगितले होते. तेव्हा सुशांत म्हणाला होता सध्या कोरोना आहे आणि त्याला त्याच्या काही सिनेमांची शूटिंग पूर्ण करायची आहे. त्यानंतर तो लग्न करेल. 

Web Title: Sushant singh rajput father kk singh talks about ankita lokhande