सुशांत सिंह राजपूतच्या फॅन्सने केली रिया चक्रवर्तीच्या खोट्या दाव्याची पोलखोल, पॅरिसचे फोटो केलेत शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 15:23 IST2020-09-01T15:23:30+5:302020-09-01T15:23:43+5:30

एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रियाने दावा केला होता की, यूरोप ट्रिपदरम्यान सुशांतची तब्येत बिघडायला सुरूवात झाली होती.

Sushant Singh Rajput fans shared Paris pics to quash Rhea Chakraborty claims | सुशांत सिंह राजपूतच्या फॅन्सने केली रिया चक्रवर्तीच्या खोट्या दाव्याची पोलखोल, पॅरिसचे फोटो केलेत शेअर

सुशांत सिंह राजपूतच्या फॅन्सने केली रिया चक्रवर्तीच्या खोट्या दाव्याची पोलखोल, पॅरिसचे फोटो केलेत शेअर

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या दु:खातून त्याचे फॅन्स अजूनही सावलेले दिसत नाही. ज्या दिवसापासून सुशांतच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा त्याचे फॅन्स त्याच्या मृत्यू मागच्या कारणाच्या अनेक थेअरीचे अंदाज सोशल मीडियावर लावत आहेत. रिया चक्रवर्तीने मुलाखतीनंतर तर आणखीन वेगळ्या मुद्द्यांवर चर्चा होत आहे. यात तिने केलेले काही दावे सुशांतच्या फॅन्सनेच खोटे ठरवले आहेत.

एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रियाने दावा केला होता की, यूरोप ट्रिपदरम्यान सुशांतची तब्येत बिघडायला सुरूवात झाली होती. पॅरिसमध्ये तीन दिवस तो हॉटेलच्या रूममधून बाहेरही आला नव्हता. रिया असंही म्हणाली होती की, त्यांना ट्रिप मधेच सोडून परतावं लागलं होतं. पण यानंतर लगेच सुशांतच्या काही फॅन्सनी काही व्हिडीओ आणि फोटोज शेअर केले होते. ज्यात तो पॅरिसमधील डिज्नीलॅंडमध्ये फिरताना दिसत आहे. आता सुशांतच्या एका फॅनने तिचा फोटो शेअर केला आहे, ज्यात सुशांत दिसतो.

स्वाती गांधी नावाच्या या फॅनने फोटो शेअर करत सांगितले की, 'मी आणि माझी फॅमिली ऑक्टोबर २०१९ मध्ये यूरोप व्हेकेशन दरम्यान पॅरिसमधील डिज्नीलॅडमध्ये भेटलो होतो. आमचं बोलणं फार कमी झालं. पण तो आनंदी होता आणि एन्जॉय करत होता. त्यामुळे हे मान्य नाही की, तो त्यावेळी काही समस्येत होता. जर तसं काही असतं तर दिसलं असतं'. तसेच आणखी एका फॅनने सुद्धा ७ ऑक्टोबर २०१९ चा फोटो शेअर केलाय. हा सुद्धा पॅरिसमधीलच आहे.

काय म्हणाली होती रिया?

रियाने मुलाखतीत म्हणाली होती की, 'आम्ही पॅरिसमध्ये लॅंड झालो. तीन दिवस सुशांत रूममधून बाहेर आलाच नाही. जाण्याआधी तो फार आनंदी होता. पण पॅरिसला पोहोचल्यावर तो रूममधून बाहेरच आला नाही. स्वित्झर्लॅडला पोहोचल्यावर तो आनंदी होता. जेव्हा आम्ही इटलीला पोहोचलो तेव्हा हॉटेलच्या रूममध्ये एक वेगळंच स्ट्रक्चर होतं. सुशांत म्हणाला होता की, इथे काहीतरी आहे. पण मी म्हणाले एखादं वाईट स्वप्न असू शकतं. त्यानंतर तो वेगळं वागायला लागला आणि रूममधून बाहेरच आला नाही'.

हे पण वाचा :

सुशांत सिंह राजपूतच्या लीक झालेल्या ऑडिओ क्लिपने खळबळ, रियाच पैसे करत होती मॅनेज!

...और उसका "ईलाज" करवा रही हो; सुशांतच्या वडिलांनाही होती त्याच्या आजाराची माहिती?

सुशांतच्या खात्यात होते 70 कोटी, रिया व तिच्या कुटुंबावर 50 लाखांची उधळपट्टी!

Web Title: Sushant Singh Rajput fans shared Paris pics to quash Rhea Chakraborty claims