सुशांत सिंग राजपूतच्या अस्थी गंगेत विसर्जित, पाटण्यामध्येच होणार श्राद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 16:21 IST2020-06-18T16:18:26+5:302020-06-18T16:21:07+5:30

सुशांतचे अंतिम संस्कार केल्यानंतर बुधवारी वडील केके सिंग आणि कुटुंबातील इतर सदस्य पाटणाला पोहोचले आहेत.

Sushant singh rajput death shraddhkarma to be held in patna | सुशांत सिंग राजपूतच्या अस्थी गंगेत विसर्जित, पाटण्यामध्येच होणार श्राद्ध

सुशांत सिंग राजपूतच्या अस्थी गंगेत विसर्जित, पाटण्यामध्येच होणार श्राद्ध

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या अस्थी गंगेत विसर्जित करण्यात आले आहेत. सुशांत सिंग राजपूतचे श्राद्धविधी पाटणामध्ये करण्यात येणार आहे. सुशांतचे अंतिम संस्कार केल्यानंतर बुधवारी वडील केके सिंग आणि कुटुंबातील इतर सदस्य पाटणाला पोहोचले आहेत. सुशांतचे वडील जेव्हा पाटाणाला आपल्या घरी परतले तेव्हा आजूबाजूचे लोक त्यांना भेटायला आला. त्यावेळी ते भावूक झाले होते.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सुशांतच्या वडिलांचे मन मुंबईत अजिबात लागत नव्हते. ते सुशांतच्या मुंबई घरीही गेला मात्र तिथेही त्यांचे मनं लागले नाही. मुलाची आठवण त्याना सतत येतेय. त्यामुळे त्यांनी पाटणाला लगेच परतण्याचा निर्णय घेतला. सुशांतच्या वडिलांची स्थिती सद्य खूपच नाजूक आहे ते काही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत. 

सूत्रांने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून सुशांतला आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागत होता. कारण त्याला अनेक प्रोजेक्टमधून बाहेर काढण्यात आले होते. एका पाठोपाठ एक अनेक प्रोजेक्ट हातचे गेल्याने सुशांत निराश होता. चौकशीतून सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिच्याबद्दलचीही नवी माहिती समोर आली आहे. दिशा आधी सुशांतसाठी काम करायची. प्राप्त माहितीनुसार, दिशाच्या माध्यमातून सुशांतला एका वेबसीरिजचा सुमारे 4 कोटी रूपयांचा प्रोजेक्ट मिळणार होता. मात्र 8 जूनला दिशानेच आत्महत्या केली.
 

Web Title: Sushant singh rajput death shraddhkarma to be held in patna