सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणाला नवे वळण, रिया चक्रवर्तीने चौकशीदरम्यान सांगितले, वांद्रेमधील सुशांतचे घर हॉन्टेड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 11:01 IST2020-06-20T10:55:24+5:302020-06-20T11:01:15+5:30
सुशांत कार्टर रोडस्थित पेंटहाऊसमध्ये राहत होता.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणाला नवे वळण, रिया चक्रवर्तीने चौकशीदरम्यान सांगितले, वांद्रेमधील सुशांतचे घर हॉन्टेड
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. सुशांतच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्यापसमोर आलेले नाही. सुशांतच्या मृत्यूनंतर अनेक अफवा उडत आहेत. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. शुक्रावारी पोलिसांनी सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवती तब्बल 9 तास विचारपूस करत तिचा जबाब नोंदवला. यात रियाने अनेक खुलासे केले आहेत.
बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, रियाने मुंबई पोलिसांनी सांगितले की सुशांत सिंग राजपूत यांचे वांद्रे इथली घर हॉन्टेड आहे. रियाला असे वाटायचे सुशांतला सुद्धा असा वाटायचे. या गोष्टीला घेऊन तो टेन्शनमध्ये सुद्धा होता.
सुशांत कार्टर रोडस्थित पेंटहाऊसमध्ये राहत होता. त्याचे भाडे सुशांत जवळपास महिन्याला 4.5 लाख द्यायचा. सुशांतच्या निधनाच्या काही दिवस आधी रियाने हे घर सोडले होते. पोलिसांना ही गोष्ट खूप खटकली. याबद्दल विचारले असता तिने सांगितले की, सुशांतचे घर सोडण्यापूर्वी दोघांमध्ये मोठे भांडण झाले होते. या भांडणानंतरचे एकमेकांना केलेले मॅसेजही तिने पोलिसांना दाखवले. या भांडणानंतर दोघांमध्ये फोनवर बोलणे झाले होते, हेही तिने सांगितले. कॉल रेकॉर्डनुसार, सुशांतने आत्महत्येपूर्वी काही तास आधी रियाला फोन केला होता. रियाच्या आधी त्याने त्याचा मित्र महेश शेट्टीलाही फोन केला होता. मात्र रियाने त्याचा फोन उचलला नव्हता.