सुशांतची बहीण मीतूने सांगितलं - १४ जूनला भावाला लावला होता फोन, पण....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 09:41 AM2020-09-03T09:41:35+5:302020-09-03T09:58:31+5:30

मीतू सिंह म्हणाल्या होत्या की, माझा छोटा भाऊ सुशांत सिंह राजपूतने २००६ मध्ये इंजिनिअरींग पास केली होती आणि नंतर तो मालिकांमध्ये काम करू लागला होता. टीव्हीमध्ये यश मिळाल्यानंतर त्याने सिनेमात काम करणं सुरू केलं होतं.

Sushant Singh Rajput Case : Sister Meetu Singh full statement about what happened to the actor | सुशांतची बहीण मीतूने सांगितलं - १४ जूनला भावाला लावला होता फोन, पण....

सुशांतची बहीण मीतूने सांगितलं - १४ जूनला भावाला लावला होता फोन, पण....

googlenewsNext

सुशांत सिंह राजपूतची बहीण मीतू सिंहने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला होता. आता त्यांचं पूर्ण  स्टेटमेंट आलं आहे. मीतू सिंह म्हणाल्या होत्या की, माझा छोटा भाऊ सुशांत सिंह राजपूतने २००६ मध्ये इंजिनिअरींग पास केली होती आणि नंतर तो मालिकांमध्ये काम करू लागला होता. टीव्हीमध्ये यश मिळाल्यानंतर त्याने सिनेमात काम करणं सुरू केलं होतं. मी माझ्या पती आणि मुलांसोबत २०१८ मध्ये मुंबईत राहू लागले होते. मुंबईत आल्यावर मी सुशांतला अनेकदा भेटले.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, मीतूने सांगितले की, ऑक्टोबर २०१९ मध्ये त्याने पूर्ण परिवाराला सांगितले होते की, तो निराश वाटतंय. त्यामुळे माझ्या बहिणी नीतू सिंह आणि प्रियंका सिंह दिल्ली आणि हरयाणावरून माझ्या भावाला त्याच्या मुंबईतील फ्लॅट नं. ६०१, माउंट ब्लॅक बिल्डींग, जॉगर्स पार्क वांर्दे वेस्ट इथे भेटायला आल्या होत्या. आम्ही सर्व बहिणी काही दिवस त्याच्यासोबत राहिलो आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. माझा भाऊ सुशांत प्रोफेशनल चढ-उतारामुळे चिंतेत होता माझी बहीण नीतू सिंह म्हणाली होती की, त्याने तिच्यासोबत दिल्लीला यायला हवं. यावर सुशांत म्हणाला होता की, तो काही दिवसांनंतर येईल.

नोव्हेंबर २०१९ मध्ये निराशा जाणवत असल्याने सुशांतनने हिंदुजा हॉस्पिटलमधील डॉ. केर्सी चावडा यांच्याकडून मेडिकल ट्रिटमेंट घेत होता. मार्च २०२० मध्ये कोरोना व्हायरसमुळे तो घरीच होता पुस्तके वाचत होता, एक्सरसाइज करत होता. तसेच मेडिटेशन आणि योगाही करत होता.

८ जूनला मीतूने सुशांतला केला होता कॉल 

८ जून २०२० च्या सकाळी मला भाऊ सुशांतचा कॉल आला होता आणि त्याने मला त्याला भेटण्यासाठी बोलवलं होतं. मी सुशांतकडे त्याच दिवशी सायंकाळी साडे पाच वाजता पोहोचले होते. जेव्हा मी त्याच्याकडे गेले तेव्हा तो फार शांत होता. मी त्याला काय झाले विचारले तर तो म्हणाला की, तो लॉकडाऊनमुळे कुठेच जाऊ शकत नाही आणि यामुळे तो फार बोर झाला आहे.

तो मला म्हणाला होता की, जेव्हा लॉकडाऊन संपेल तेव्हा दक्षिण भारतात फिरायला जाऊ. सुशांतने मला सांगितले होते की, मला काही दिवस त्याच्याकडे थांबायचे आहे. मी तसंच केलं. जेव्हा मी त्याच्याकडे होते तेव्हा त्याच्या आवडीच्या डिशेज बनवत होते. आम्ही बोलत होतो आणि लॉकडाऊननंतर साऊथ इंडियात फिरायला जाण्याचा प्लॅनही केला होता. १२ जूनला माझी मुलगी गोरेगावात एकटी होती. त्यामुळे मी सायंकाळी ४.३० वाजता माझ्याा घरी गोरेगगावला गेले. घरी पोहोचल्यावर मी सुशांतला मेसेज केला. पण त्याने ना कॉल केला ना मेसेज केला.

१४ जूनला मीतूने केला होता सुशांतला फोन

१४ जूनला मी माझा भाऊ सुशांतला सकाळी १०.३० वाजता कॉल केला होता. पण त्याने माझा फोन उचलला नाही. त्यामुळे मी सिद्धार्थ पिठानीला कॉल केला. तो सुशांतसोबत राहत होता. त्याने मला सांगितले होते की, त्याने सुशांतला नारळ पाणी आणि डाळिंबाचं ज्यूस दिलं. तो आता झोपतोय. त्याने दरवाजा वाजवला होता, पण दरवाजा आतून बंद होता.

मी सिद्धार्थ म्हणाला होता की, सुशांत कधीही आतून दरवाजा लॉक करत नाही आणि मी त्याला पुन्हा दरवाजा नॉक करण्यासाठी सांगितले होते. सुशांतला हेही सांगण्यास सांगितले होते की, मी त्याला कॉल करतेय. सिद्धार्थने मला सांगितले की, त्याने अनेकदा सुशांतच्या बेडरूमला नॉक केलं. पम त्याने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे तो दरवाजाच्या कि-मेकरला फोन करत आहे. जेणेकरून दरवाजा बाहेरून उघडता यावा. मी सिद्धार्थच्या या कॉलनंतर लगेच गोरेगावातून बांद्र्यासाठी निघाले होते.  

टॅक्सीने येत असताना मला सिद्धार्थचा कॉल आला होता आणि त्याने मला सांगितलं की, सुशांतच्या रूमचा दरवाजा उघडला आणि सुशांतची बॉडी पंख्याला लटकलेली आढळली आहे. सिद्धार्थ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सुशांतची बॉडी खाली उतरवली. त्याने पोलिसांना सुद्धा कॉल केला आणि बांद्रा पोलीस तिथे पोहोचलेही होते. मी याबाबत माझी बहीण मीतू आणि प्रियांकाला सांगितले होते. यानंतर पोलीस सुशांतला घेऊन कुपर हॉस्पिटलला गेले होते. तिथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मला नाही माहीत की, सुशांतने आत्महत्या बिझनेसमुळे केली की अन्य काही कारणाने केली.

'सुशांत मृत्यू प्रकरणात राजकीय स्वार्थ', रियावरील आरोपांचे सतीश मानेशिंदेंनी केले खंडन

सुशांतच्या कुटुंबियांचा मोठा खुलासा!, त्यांना त्याच्या डिप्रेशनबद्दल आधीपासून होती कल्पना

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात हत्येचा पुरावा नाही, तपास सुरू आहे; सीबीआय अधिकाऱ्याची महत्त्वपूर्ण माहिती

Web Title: Sushant Singh Rajput Case : Sister Meetu Singh full statement about what happened to the actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.