सीबीआयच्या 'त्या' प्रश्नावर चवताळली रिया चक्रवर्ती, अधिकाऱ्यांसोबत घातला वाद?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 11:52 AM2020-08-31T11:52:49+5:302020-08-31T12:03:09+5:30

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सीबीआय रिया चक्रवर्तीची कसून चौकशी करते आहे.

Sushant singh rajput case rhea chakraborty gets angry over cbi officers during interrogation | सीबीआयच्या 'त्या' प्रश्नावर चवताळली रिया चक्रवर्ती, अधिकाऱ्यांसोबत घातला वाद?

सीबीआयच्या 'त्या' प्रश्नावर चवताळली रिया चक्रवर्ती, अधिकाऱ्यांसोबत घातला वाद?

googlenewsNext

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सीबीआय रिया चक्रवर्तीची कसून चौकशी करते आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार रविवारी चौकशी दरम्यान रियाने सीबीआयच्या अधिकाऱ्यांशी वाद घातला.  अधिकाऱ्यांनी जेव्हा रियाला ड्रग्सबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली त्यावेळी ती भडकली. रिपोर्टनुसार रियाने सीबीआय अधिकाऱ्यांशी मोठ्या आवाजात बोलू लागली यावर एसपी नुपूर प्रसाद म्हणाल्या,सीबीआयला घाईघाईत कोणताच निर्णय घ्यायचा नाही आहे. जर आपण निर्दोष असाल तर पुरावा द्या आणि तपासात सहकार्य कर.

रिया चक्रवर्तीचे काही व्हॉट्सअ‍ॅप चॅटींगमधून समोर आले आहे की, ती कथितपणे ड्रग्सचं सप्लाय करणाऱ्या लोकांच्या संपर्कात होती. आणि तिने कथितपणे दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला ड्रग्स देण्यासाठी संपर्क ठेवला. ड्रग्स अ‍ॅंगल समोर आल्यानंतर सीबीआय आणि ईडीससोबतच आता Narcotics Control Bureau (NCB) सुद्धा सुशांतच्या मृत्यूचा तपास करत आहे.

दोन ड्रग्स पॅडलर्सना अटक 
दरम्यान, सुशांत केसमध्ये समोर आलेल्या ड्रग अ‍ॅंगलचा तपास करण्यासाठी NCB ची दिल्लीहून मुंबईला आली आहे. NCB चे डेप्युटी डायरेक्टर केपीएस मल्होत्रा आणि त्यांच्या टीमने दोन अशा पॅडलर्सना अटक केलीये, जे मुंबईतील हाय प्रोफाइल पार्ट्यांमध्ये वापरली जाणारी ड्रग सप्लाय करत होते. NCB ने करन अरोरा आणि अब्बास या दोघांना अटक केलीये. एनसीबीनुसार, हे दोघे डार्कनेटच्या माध्यमातून परदेशातून ड्रग्स मागवत होते. हे ड्रग्स कुरिअर किंवा इंटरनॅशनल पोर्टच्या माध्यमातून मुंबईत येत होते.

“सुशांत सिंग प्रकरणात मुंबई पोलिसांवर दबाव टाकणाऱ्या मंत्र्याची माहिती सीबीआयला देण्यास तयार”

Web Title: Sushant singh rajput case rhea chakraborty gets angry over cbi officers during interrogation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.