रिया चक्रवर्तीच्या दाव्याची सॅम्युअलकडून पोलखोल, म्हणाला - त्याला कधीच औषध घेताना पाहिलं नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 15:22 IST2020-08-29T15:22:37+5:302020-08-29T15:22:46+5:30
रिया चक्रवर्तीने एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अनेक दावे केले आहेत. पण तिने केलेल्या दाव्यांवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातील काही सुशांतचे जवळचे लोकही आहेत.

रिया चक्रवर्तीच्या दाव्याची सॅम्युअलकडून पोलखोल, म्हणाला - त्याला कधीच औषध घेताना पाहिलं नाही!
सुशांत सिंह राजपूत केसमध्ये सतत वेगवेगळे दावे केले जात आहेत तर ते केलेले दावे इतरांकडून खोटे ठरवले जात आहे. सुशांतची गर्लफ्रेन्ड आणि या केसमधील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीने एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अनेक दावे केले आहेत. पण तिने केलेल्या दाव्यांवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातील काही सुशांतचे जवळचे लोकही आहेत. सुशांतचा मित्र सॅम्युअल हाओकिपने रियाचा दावा फेटाळून लावला की, सुशांतला फ्लाइटमध्ये भीती वाटत होती आणि तो फ्लाइटमध्ये बसण्याआधी मोडफिनील नावाचं औषध घेत होता.
डिसेंबर २०१८ मध्ये सुशांत आपल्या ६ मित्रांसोबत थायलॅंडला गेला होता. रियाने दावा केला होता की, या ट्रिपवर सुशांतने ७० लाख रूपये खर्च केले होते. सुशांतसोबत या ट्रिपवर सॅम्युअलही जाणार होता. पण काही कारणाने जाऊ शकला नाही. मात्र, सॅम्युअलने या ट्रिपवर किती खर्च झाला होता हे सांगितले नाही. पण त्याने रियाचा हा दावा फेटाळला की, सुशांतला फ्लाइटमध्ये भीती वाटत होती.
मिड डे सोबत बोलताना सॅम्युअलने सांगितले की, तो सुशांतसोबत ऑक्टोबर २०१८ पासून ते जुलौ २०१९ पर्यंत होता. त्याने सांगितले की, थायलॅंड ट्रिपवर सुशांतसोबत सिद्धार्थ गुप्ता, कुशल झावेरी, अब्बास, मुश्ताक, साबिर अहमद गेले होते. सॅम्युअलने हेही सांगितले की, या ट्रिपवर सुशांतसोबत सारा अली खानही गेली होती.
सॅम्युअलने रियाचा दावा फेटाळला की, सुशांतला क्लॉस्ट्रोफोबिया होता आणि फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी तो मोडाफिनिल नावाचं औषध घेत होता. त्याने सांगितले की, त्याने सुशांतसोबत अनेकदा प्रवास केला आहे आणि त्याला अजिबात आठवत नाही की, फ्लाइटआधी सुशांत काही औषध घेत होता.
सॅम्युअल म्हणाला की, जर सुशांत क्लॉट्रोफोबिक असता तर फ्लाइटमध्ये परेशान झाला असता. पण तो तर फ्लाइट दरम्यान पुस्तके वाचत होता म्युझिक ऐकत होता किंवा आवडीचं जेवण करत होता. त्याने हेही सांगितले की, जोपर्यंत तो सुशांतसोबत होता तोपर्यंत त्याने सुशांतला कधीही केमिकल ड्रग घेताना पाहिले नाही.
हे पण वाचा ;
बाबो.. ! रिया चक्रवर्तीला ही चूक पडू शकते महागात, सुशांतच्या बहिणीने आणली जगासमोर
सारासोबत ३ दिवस बॅंकॉकच्या हॉटेलमध्ये होता सुशांत - साबिर अहमद
काय आहे रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूतच्या सिनेमाची सायनिंग अमाउंट १५ कोटीचं गुपित?
रियाला मुलाखतीवरून शेखर सुमन यांचा टोला, म्हणाले- माझ्याही स्वप्नात आला सुशांत आणि ...
धक्कादायक! सुशांतची बहीण श्वेताकडून ड्रग ग्रुपचं चॅटींग लीक, रियाचा मेसेज - 'डूबी'ची गरज आहे!