सुशांतच्या भावोजीचा खुलासा - भावासाठी मला ५ वेळा सोडून गेली होती श्वेता....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 14:31 IST2020-09-04T14:26:56+5:302020-09-04T14:31:09+5:30

गेल्या काही दिवसांपूर्वीच रिया चक्रवर्तीने मुलाखतीतून आरोप लावला होता की, सुशांतचा परिवार त्याच्या टचमध्ये नव्हता. यावर सुशांतच्या बहिणींचेही अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.

Sushant Singh Rajput brother in law Vishal Singh kirti relveals his wife left him 5 times | सुशांतच्या भावोजीचा खुलासा - भावासाठी मला ५ वेळा सोडून गेली होती श्वेता....

सुशांतच्या भावोजीचा खुलासा - भावासाठी मला ५ वेळा सोडून गेली होती श्वेता....

सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा पती विशाल सिंह किर्ति यूएसमध्ये राहतो. त्याने ब्लॉग लिहून सांगितले की, ५ वेळा त्याची पत्नी म्हणजे श्वेता सिंह ही सुशांतसोबत राहण्यासाठी त्याला सोडून गेली. गेल्या काही दिवसांपूर्वीच रिया चक्रवर्तीने मुलाखतीतून आरोप लावला होता की, सुशांतचा परिवार त्याच्या टचमध्ये नव्हता. यावर सुशांतच्या बहिणींचेही अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.

चमकता तारा गेला

विशाल सिंहने त्याच्या ब्लॉगमध्ये लिहिले की, त्याला याबाबत तक्रार नाही की, त्याची पत्नी त्याला सोडून गेली. तर त्याला राजपूत परिवाराच्या बॉन्डींचं कौतुक करायचं आहे. त्याने लिहिले की, आता त्यांना दु:खं आहे की, ती आता अशा ट्रिप पुन्हा करू शकणार नाही. कारण त्यांच्या परिवारातील चमकता तारा निघून गेलाय.

अ‍ॅनिव्हर्सरीला केला होता डान्स

विशालने लिहिले की, २०१४ मध्ये तो समर ब्रेकमध्ये भारतात येणार होता. पण श्वेताला समजलं की, राणी ताईच्या अ‍ॅनिव्हर्सरीवर कार्यक्रम होणार आहे. तिथे सुशांत येणार आहे. तिने समर ब्रेकची तिकीटे कॅन्सर केली आणि भारतात जाण्यासाठी निघाली.

केवळ ३ दिवसांसाठी भारतात आली होती श्वेता

२०१५ मध्ये श्वेता सुशांतला भेटण्यासाठी रांचीला पोहोचली होती. जिथे एमएस धोनी सिनेमाचं शूटींग सुरू होतं. ती मुलाला सोबत घेऊन गेली होती. २०१६ मध्ये पूर्ण परिवाराने हा सिनेमा सोबत बघण्याचा निर्णय घेतला होता. ती ३ दिवसांच्या ट्रिपसाठी भारतात आली होती. तिने भारतात तीन दिवस थांबण्यासाठी २ दिवस फ्लाइटमध्ये काढले.

जानेवारी २०२० मध्ये भेटू शकले नाहीत

२०१७ मध्ये ती मला सोडून गेली नाही. यावेळी आम्ही सगळे सुशांतसोबत फिरलो. २०२० जानेवारीत ती पुन्हा काही दिवसांसााठी भारतात गेली. यावेळीही मी सोबत नव्हतो. ती सुशांतसोबत राहण्यासाठी चंडीगढला गेली होती. वाईट वाटलं तो अशा परिस्थितीत होता ते भेटू शकले नाहीत. सगळ्यांना त्याचं कारण माहीत आहे. शेवटी १४ जूनला बातमी मिळताच तिला जेवढ्या लवकर होईल भारतात जायचं होतं. जेणेकरून भावाला शेवटचं भेटू शकेल.

हे पण वाचा :

सुशांतची बहीण मीतूने सांगितलं - १४ जूनला भावाला लावला होता फोन, पण....

सुशांतच्या कुटुंबियांचा मोठा खुलासा!, त्यांना त्याच्या डिप्रेशनबद्दल आधीपासून होती कल्पना

सुशांत सिंह राजपूतचं वडिलांसोबत नातं चांगलं नव्हतं, रियाचा हा दावा खोटा ठरवणारा व्हिडीओ!

Web Title: Sushant Singh Rajput brother in law Vishal Singh kirti relveals his wife left him 5 times