सुशांत सिंग राजपूत व श्रद्धा कपूरच्या 'छिछोरे'चे पहिले शेड्यूल पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 20:13 IST2018-10-31T20:10:15+5:302018-10-31T20:13:18+5:30

अभिनेता सुशांत सिंग राजपूत व अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा आगामी विनोदी चित्रपट 'छिछोरे' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sushant Singh Rajput and Shraddha Kapoor's 'Chhichore' complete the first schedule | सुशांत सिंग राजपूत व श्रद्धा कपूरच्या 'छिछोरे'चे पहिले शेड्यूल पूर्ण

सुशांत सिंग राजपूत व श्रद्धा कपूरच्या 'छिछोरे'चे पहिले शेड्यूल पूर्ण

ठळक मुद्दे'छिछोरे' सिनेमा पुढील वर्षी होणार प्रदर्शितसुशांत सिंग राजपूत व श्रद्धा कपूर पहिल्यांदाच एकत्र


अभिनेता सुशांत सिंग राजपूत व अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा आगामी विनोदी चित्रपट 'छिछोरे' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचे पहिले शेड्यूल पूर्ण झाले आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटरवर एक फोटो शेअर करीत ही माहिती दिली आहे.


'छिछोरे' हा चित्रपट हमखास मनोरंजन करणारा असेल याची पहिली झलक पोस्टर पाहताना दिसली होती. पोस्टरवर सर्व कलाकारांची दोन पिढी पाहायला मिळत असून त्यावर 'कुत्ते की दुम, टेढी की टेढी' असे याला कॅप्शन देण्यात आले होते. या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केल्यानंतर या सिनेमाबाबतची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटाचे पहिल्या शेड्युलचे चित्रीकरण पार पडले असून तरण आदर्श यांनी ट्विटरवर संपूर्ण टीमचा फोटो व ही माहिती दिली आहे.


या सिनेमात सुशांत सिंग राजपूत, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, ताहिर राज भसीन, नविन पोलीशेट्टी, तुषार पांडे, सहर्ष शुक्ला आणि प्रतिक बब्बर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रद्धा व सुशांत पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर कशी वाटते हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. नितेश तिवारी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. साजिद नाडियादवाला यानी या सिनेमाची निर्मिती फॉक्स स्टार स्टुडिओसोबत केली आहे.'छिछोरे' हा सिनेमा ३० ऑगस्ट २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


 

Web Title: Sushant Singh Rajput and Shraddha Kapoor's 'Chhichore' complete the first schedule