सुशांत सिंग राजपूत व श्रद्धा कपूर बनले 'छिछोरे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 08:00 IST2018-10-09T16:19:17+5:302018-10-10T08:00:00+5:30

नितेश तिवारी यांच्या 'छिछोरे' चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाच्या पोस्टरवर श्रद्धा कपूर व सुशांत सिंग राजपूत दोन लूकमध्ये दिसत आहेत.

Sushant Singh Rajput and Shraddha Kapoor became 'Chhichore' | सुशांत सिंग राजपूत व श्रद्धा कपूर बनले 'छिछोरे'

सुशांत सिंग राजपूत व श्रद्धा कपूर बनले 'छिछोरे'

ठळक मुद्दे'छिछोरे' सिनेमा पुढील वर्षी होणार प्रदर्शितसुशांत सिंग राजपूत व श्रद्धा कपूर पहिल्यांदाच एकत्र


'दंगल'सारखी बॉक्स ऑफिसवर कमालीचा व्यवसाय करणाऱ्या सिनेमाचे दिग्दर्शन केल्यानंतर नितेश तिवारी 'छिछोरे' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवर श्रद्धा कपूर व सुशांत सिंग राजपूत इंटरेस्टिंग लूकमध्ये दिसत आहेत. हे दोघे या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र काम करत आहेत.

'छिछोरे' चित्रपटाच्या पोस्टरवर सुशांत सिंग राजपूत व श्रद्धा कपूर यांच्यासोबत अभिनेता वरूण शर्मादेखील दिसतो आहे. या सिनेमात प्रतीक बब्बरदेखील असून तो निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला करत आहे. 'छिछोरे' सिनेमा पुढील वर्षी 30 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची कथा मजेशीर असून या पोस्टरवर ‘कुत्ते की दुम टेढ़ी, टेढ़ी की टेढ़ी’ अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. या पोस्टरवर सर्व कलाकारांची दोन पिढी पाहायला मिळते आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केल्यानंतर या सिनेमाबाबतची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरूवात होणार असल्याचे बोलले जात आहे.


सध्या श्रद्धा कपूर सायना नेहवाल बायोपिकचे चित्रीकरण करत आहे. 'छिछोरे' चित्रपटाचा पोस्टर पाहिल्यानंतर सुशांत सिंग राजपूत व श्रद्धा कपूर यांचे या चित्रपटाबाबत अजून माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. 


 

Web Title: Sushant Singh Rajput and Shraddha Kapoor became 'Chhichore'