सुशांतच्या गर्लफ्रेंडची पोलिस चौकशी सुरू,पोलिस स्थानकात हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 12:53 IST2020-06-18T12:50:23+5:302020-06-18T12:53:22+5:30

सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला फोन केला होता. मात्र फोन न उचलल्यामुळे काहीही बोलणे झाले नाही. तसेच काही ...

Sushant singh rajpur suicide case girlfriend Rhea Chakraborty Arrives At Bandra Police Station | सुशांतच्या गर्लफ्रेंडची पोलिस चौकशी सुरू,पोलिस स्थानकात हजर

सुशांतच्या गर्लफ्रेंडची पोलिस चौकशी सुरू,पोलिस स्थानकात हजर

सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला फोन केला होता. मात्र फोन न उचलल्यामुळे काहीही बोलणे झाले नाही. तसेच काही दिवस ती सुशांतह राहत होती. दोघेही लग्न करणार होते. त्यासाठी घराच्याही शोधात असल्याचे बोलले जाते. सुशांतसह अखेरच्या दिवसांत रियाच त्याच्या सर्वात जवळ होती त्यामुळे आत्महत्येमागे रिया कारणीभूत असू शकते असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तिची चौकशी सुरू झाली आहे. पोलिसांकडून तिला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. यातून पोलिसांनी कोणते पुरावे मिळतात का याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे. 

पोलिसांनी आतापर्यंत सुशांत आत्महत्याप्रकरणी 9 जणांचे जबाब नोंदवले आहेत. त्यामध्ये सुशांतच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. त्याच्या दोन बहिणी, वडील आणि क्रिएटिव्ह मॅनेजर सिद्धार्थ पीठानी यांच्यासह घरातच राहणारा केअर टेकर दीपेश सावंत यांची स्टेटमेंट घेण्यात आली आहेत. पोलिसांनी सुशांतच्या दोन्ही बहिणींचे दुसऱ्यांदा जबाब नोंदवले आहेत.


सुशांतच्या काही चाहत्यांनी आणि कंगना रानौत, अभिनव कश्यप यांच्यासारख्या कलाकारांनी थेट नेपोटिझमचे आरोप केले आहेत. आणि याच कारणामुळे सुशांतने शेवटचं पाऊल उचललं असं म्हटलं जात आहे. 


 

Web Title: Sushant singh rajpur suicide case girlfriend Rhea Chakraborty Arrives At Bandra Police Station