'तेव्हा सुशांतला कोणतेच डिप्रेशन नव्हते', अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्तीच्या दाव्यांवर दिले सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 12:16 IST2020-08-28T12:15:52+5:302020-08-28T12:16:20+5:30

अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून रिया चक्रवर्तीला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. 

'Sushant had no depression', Ankita Lokhande responds to Riya Chakraborty's claims | 'तेव्हा सुशांतला कोणतेच डिप्रेशन नव्हते', अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्तीच्या दाव्यांवर दिले सडेतोड उत्तर

'तेव्हा सुशांतला कोणतेच डिप्रेशन नव्हते', अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्तीच्या दाव्यांवर दिले सडेतोड उत्तर

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने तिच्यावर केलेल्या आरोपांवरील चुप्पी नुकतीच तोडली आहे. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने सुशांतबद्दलच्या बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ माजली. रिया चक्रवर्तीने सुशांतच्या कुटुंबासोबत त्याचे मित्र आणि एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेबद्दल बरेच दावे केले. तिने केलेल्या दावे अंकिता लोखंडे हिने फेटाळून लावले आहेत. अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून रिया चक्रवर्तीला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

अंकिता लोखंडे हिने इंस्टाग्रामवर पोस्टवर लिहिले की, रिलेशनशीपला सुरूवात झाल्यापासून 23 फेब्रुवारी, 2016 पर्यंत मी आणि सुशांत एकत्र होतो तोपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचे डिप्रेशन नव्हते. सुशांत पूर्णपणे बरा होता.


त्यानंतर अंकिताने पुढे म्हटले की, मी कधीच म्हटले नाही की ब्रेकअपनंतरही आम्ही दोघे एकमेकांच्या संपर्कात होतो. सत्य हे आहे की मी म्हटले होते की मणिकर्णिका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुशांतने माझ्या चित्रपटाच्या पोस्टरवर कमेंट करत मला शुभेच्छा दिल्या होत्या. हे पोस्टर मी नाही तर माझ्या मित्राने शेअर केले होते. मी फक्त त्याचे उत्तर दिले होते. मी रियाचे दावे फेटाळून लावते की मी आणि सुशांतने फोनवर बातचीत केली होती.

तिने सांगितले की, मी आतापर्यंत माझ्या मुलाखतीत एकच गोष्ट सांगितली आहे की सुशांत जोपर्यंत माझ्यासोबत होता तोपर्यंत तो बरा होता. त्याला कोणत्याही प्रकारचे डिप्रेशन नव्हते. आम्ही त्याच्या यशाची स्वप्न एकत्र पाहत होतो आणि मी प्रार्थना करत होते आणि तो यशस्वी होत होता. हेच मी आतापर्यंत सांगितले आहे.


सुशांतच्या निधनानंतर अंकिता त्याच्या कुटुंबाच्या बाजूने उभी राहिली आहे आणि त्याला न्याय मिळावा, यासाठी प्रार्थना करते आहे.

Web Title: 'Sushant had no depression', Ankita Lokhande responds to Riya Chakraborty's claims