सूरज पांचोलीसाठी मिळता मिळेना ‘हिरोईन’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2017 14:23 IST2017-03-20T08:53:54+5:302017-03-20T14:23:54+5:30
अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली सध्या आपल्या आगामी चित्रपटासाठी बराच घाम गाळतोय. या चित्रपटासाठी सूरज स्ट्रिक डाएटवर आहे ...

सूरज पांचोलीसाठी मिळता मिळेना ‘हिरोईन’!!
अ िनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली सध्या आपल्या आगामी चित्रपटासाठी बराच घाम गाळतोय. या चित्रपटासाठी सूरज स्ट्रिक डाएटवर आहे आणि त्याने सुमारे पाच किलो वजन घटवले आहे. आता इतकी तयारी म्हटल्यावर शूटींगची तयारीही जोरात असणार. पण नेमकी इथे एक अडचण आहे. होय, खरे तर सूरजच्या शूटींगची पूर्वतयारी झाली आहे. शूटींग कुठे होणार, ती ठिकाणंही ठरली आहेत. पण अडचण आहे ती हिरोईनची. होय, या चित्रपटासाठी सूरजच्या अपोझिट कोण हिरोईन असणार, हे अद्याप ठरलेले नाहीय. अद्याप म्हणे, या हिरोईनचा शोधच सुरु आहे.
ALSO READ : सूरजचे करिअर लागेल का मार्गी??
रायटर आणि डायरेक्टर फारूख कबीर एक रोमॅन्टिक थ्रीलर घेऊन येणार आहेत. हा चित्रपट सूरजचा २०१५ मध्ये आलेल्या ‘हिरो’चा सीक्वल असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटासाठी फारूख कबीर यांनी सूरजला लीड रोलमध्ये तर घेतले पण सूरजच्या अपोझिट कुठल्या हिरोईनला घ्यावे, हेच त्यांना कळत नाहीयं. आता असे का? तर ते आम्हाला माहित नाही. अर्थात या समस्येवर लवकरच तोडगा काढला जाईल, असे वाटतेय. तोपर्यंत तरी फारूख कबीर यांना आपल्या चित्रपटाचे फर्स्ट शेड्यूल सूरजसोबतच शूट करावे लागणार आहे.
‘हिरो’मध्ये सूरजच्या सोबत आथिया शेट्टी दिसली होती. अर्थात हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला होता. तरिही या चित्रपटाचा सीक्वल येतो आहे, म्हटल्यावर त्यात काय नवे पाहायला मिळेल, याची प्रतीक्षा आहेच.
फारूख कबीर यांनी २०१० मध्ये ‘अल्लाह के बंदे’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले होते. या चित्रपटात नसीरूद्दीन शहा, शर्मन जोशी, अंजना सुखानी, अतुल कुलकर्णी आदी कलाकार होते.