'बाहुबली' फेम दिग्दर्शक राजामौलींसोबत काम करताना दिसणार हा सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 10:52 IST2020-04-20T10:51:50+5:302020-04-20T10:52:23+5:30

हा सुपरस्टार आहे महाराष्ट्राचा जावई

The superstar will be seen working with 'Baahubali' fame director S.S.Rajamouli TJL | 'बाहुबली' फेम दिग्दर्शक राजामौलींसोबत काम करताना दिसणार हा सुपरस्टार

'बाहुबली' फेम दिग्दर्शक राजामौलींसोबत काम करताना दिसणार हा सुपरस्टार

बाहुबली आणि आरआरआरचे प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या आगामी चित्रपटात सुपरस्टार महेश बाबू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सरिलरु नीकेवरुमधील आपल्या शानदार प्रदर्शनाने 2020 वर्षे आपल्या नावे करणारा सुपरस्टार महेश बाबूचा आगामी चित्रपट कोणता असेल या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. चित्रपटाचे नाव अजून गुलदस्त्यात असून पुढील वर्षी याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे आणि 2022 मध्ये याच्या शुटींगला सुरुवात होईल.

नुकत्याच एका मुलाखतीत राजामौली यांनीच या वृत्ताला दुजोरा देताना म्हटले, ही अफवा नसून तथ्य आहे की माझ्या दिग्दर्शनात महेश बाबू काम करणार असून केएल नारायण या चित्रपटाचे निर्माते असतील. ‘आरआरआर’ नंतर हा माझा पुढचा सिनेमा असेल.

तेलुगुमधील एक सर्वात मोठा अभिनेता आणि तेलुगुमधील एक सर्वात मोठा दिग्दर्शक, या प्रकल्पासाठी एकत्र येत आहेत, चाहत्यांसाठी ही मोठीच पर्वणी असेल. महेश बाबूचे चाहते केवळ दक्षिणेपुरताच सीमित नसून हा अभिनेता पैन इंडिया सुपरस्टार आहे. आणि हेच एक कारण आहे कि त्याचे सगळे चित्रपट बॉक्स ऑफिस तुफान चालले आहेत.

महेश बाबूचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा सरिलरु नीकेवरुने बॉक्स ऑफिसवर २०० करोड हून अधिक कमाई करण्यात यशस्वी झाली आहे. हा चित्रपट 100 करोडचा आकडा गाठणारा महेश बाबूचा लागोपाठ तीसरा सिनेमा ठरला आहे. यामध्ये प्रथमच महेश बाबू एका सेना अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता.

 

 

 

Web Title: The superstar will be seen working with 'Baahubali' fame director S.S.Rajamouli TJL