सुपर मॉडेल आणि मिस्टर इंडिया प्रतीक जैन लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 06:00 AM2019-12-31T06:00:00+5:302019-12-31T06:00:00+5:30

मॉडेलिंगच्या जगतानंतर आता सुपर मॉडेल व मिस्टर इंडिया प्रतीक जैन बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Supermodel and Mr India Prateek Jain to make Bollywood debut soon | सुपर मॉडेल आणि मिस्टर इंडिया प्रतीक जैन लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण 

सुपर मॉडेल आणि मिस्टर इंडिया प्रतीक जैन लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण 

googlenewsNext

इन्व्हेस्टमेंट बँकर, मिक्स मार्शल आर्ट्स आणि त्यानंतर मॉडेलिंगच्या जगतानंतर आता सुपर मॉडेल व मिस्टर इंडिया प्रतीक जैन बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो 'आलिशान' या चित्रपटात झळकणार आहे. 

प्रतीक जैन बंगळुरूचा असून तो मिक्स मार्शल आर्ट्समध्ये कुशल आहे, पण त्यात तो फार काळ टिकू शकला नाही. त्याला मार्शल आर्ट्स करताना गंभीर इजा झाली आणि त्याला मार्शल आर्ट्स सोडावे लागले. त्यानंतर तो २०१४ मध्ये मुंबईत आला आणि फेसबुकच्या माध्यमातून ब्रँडसाठी शूट करण्याची ऑफर मिळाली. हळूहळू त्याने मॉडेलिंग क्षेत्रात आपले बस्तान मांडायला सुरूवात केली.

बर्‍याच नामांकित ब्रँड्सबरोबर शुटिंग व मॉडेलिंग केल्यानंतर प्रतीक सहा महिन्यात मिस्टर वर्ल्ड इंडिया २०१४ चा विजेता झाला.


प्रतीक जैनने नुकतेच तेलगू चित्रपट 'वेंकी मामा'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटाने आतापर्यंत 60 कोटींहून जास्त बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. चित्रपट ब्लॉकबस्टर झाल्यावर प्रेक्षक प्रतीक जैनची प्रशंसा करीत आहे आणि सुपरस्टार यश बरोबर त्याची तुलना करत आहे. 


प्रतीक जैनने "डिअर जिंदगी" ह्या चित्रपटात कॅमिओ रोल केला होता आणि आता तो "आलिशान" या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री करतो आहे.

'आलिशान' एक अॅक्शन थ्रिलर सिनेमा आहे. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजे 2020मध्ये रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Supermodel and Mr India Prateek Jain to make Bollywood debut soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.