सुपरहिरोज इन लव्ह!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2016 17:00 IST2016-10-10T11:29:48+5:302016-10-10T17:00:52+5:30

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी याअगोदर एकत्र कधीच काम केले नाही. पण, ते दोघे एकत्र परफेक्ट दिसू शकतात, ...

Superheroes in Love! | सुपरहिरोज इन लव्ह!

सुपरहिरोज इन लव्ह!

बीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी याअगोदर एकत्र कधीच काम केले नाही. पण, ते दोघे एकत्र परफेक्ट दिसू शकतात, असे अनेकवेळा दिग्दर्शकांसोबतच चाहत्यांनाही जाणवलेय.

आता लवकरच ते दोघे रणबीरचा जवळचा मित्र, दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या ‘ड्रॅगन’ या चित्रपटात दिसणार आहेत. अयानने सांगितले की, ‘यात रणबीर एक सुपरहिरोच्या भूमिकेत दिसेल. तर त्याच्यासोबत असलेल्या इतर कलाकारांकडेही सुपरपॉवर्स असतात.

‘ड्रॅगन’ हे चित्रपटाचे नाव कालांतराने बदलण्यात येईल.’ चर्चा अशीही आहे की, सुपरहिरोकडे कोणत्या पॉवर्स असाव्यात याविषयी काही युक्त्या रणबीरकडे असल्याने त्याने त्या अयानकडे शेअर केल्या. तसेच अमिताभ बच्चन यांनाही चित्रपटात महत्त्वाची भूमिका देण्यात आल्याचे कळतेय.

Web Title: Superheroes in Love!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.