सनी म्हणते, ‘मी सर्वांत मोठी मूर्ख’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 17:46 IST2016-12-07T17:45:13+5:302016-12-07T17:46:42+5:30

शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल, सनीला काय झाले? स्वत:लाच ती मूर्ख का म्हणतेय? तिने ट्विटरवर तिचा एक जुना व्हिडीओ शेअर ...

Sunny says, 'I'm the biggest fool' | सनी म्हणते, ‘मी सर्वांत मोठी मूर्ख’

सनी म्हणते, ‘मी सर्वांत मोठी मूर्ख’

र्षक वाचून तुम्ही म्हणाल, सनीला काय झाले? स्वत:लाच ती मूर्ख का म्हणतेय? तिने ट्विटरवर तिचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. अत्यंत फनी पण क्यूट सनी आपल्याला त्यात पहावयास मिळते. गाणे म्हणत ती त्यावर डान्स करते. हा व्हिडीओ पाहताना सनीलाच खूप हसू येऊन ती स्वत:बद्दलच म्हणते,‘मी फार मोठी मूर्ख होते.’

नुकताच ‘रईस’चा ट्रेलर आऊट झाला. चित्रपटात सनीने ‘लैला मैं लैला’ हे गाणे अत्यंत हॉट अंदाजात साकारले आहे. त्याचबरोबर तिचा ‘बादशाहो’, ‘तेरा इंतजार’ यातील तिचा किटी लूक चाहत्यांचे लक्ष्य आकर्षून घेतो. पूर्वाश्रमीची पॉर्नस्टार पण आता बॉलिवूडच्या सर्वांत हॉट अभिनेत्रींपैकी एक म्हणून सनी ओळखली जाते. तिची अदा चाहत्यांना प्रत्येकच चित्रपटात घायाळ करते. अशी हॉट सनी जेव्हा कामावरून सुट्टी घ्यायची तेव्हा घरी सोफ्यावर गाणे म्हणत मस्त धम्माल डान्स करीत असे. हा कार्यक्रम तिचा प्रत्येक आठवडी सुट्टीचा असायचा. आता मात्र हा व्हिडीओ पाहून तिला खूप हसू येतेय. ट्विटरवर व्हिडीओ अपलोड करून तिने ‘यूज्ड टू जंप आॅन माय कोच व्हेन आय वॉज लिटील सिंगिंग धीस साँग! व्हाय नॉट डू इट वन्स मोअर! येस आय अ‍ॅम द बिगेस्ट डॉर्क! व्हॉट आय डू आॅन माय डे आॅफ!’ अशी कॅप्शन दिलीय. 

बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लिओनीने आत्तापर्यंत अनेक चित्रपटात हॉट अ‍ॅण्ड सेक्सी भूमिका केल्या आहेत. प्रेक्षकांना स्वत:कडे आकर्षित करायची कला सनीला उत्तम जमते. ‘वन नाईट स्टँण्ड’, ‘बेईमान लव्ह’, ‘रागिनी एमएमएस २’, ‘एक पहेली लीला’, ‘कुछ कुछ लोचा हैं’ अशा अनेक सेक्स कॉमेडी आधारित चित्रपटात तिने भूमिका साकारल्या आहेत. अल्पावधीत तिने बॉलिवूडमध्ये तिची एक स्पेस निर्माण केली आहे. तर अशी सनी मूर्ख कशी असू शकेल? नाही ना.. 
 

Web Title: Sunny says, 'I'm the biggest fool'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.