मेकअपशिवाय सनी लिओनीला ओळखणे देखील होते अशक्य, पाहा तिचे हे फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 15:46 IST2021-01-27T15:45:39+5:302021-01-27T15:46:49+5:30
सनीच्या सौंदर्यावर तर अनेक जण फिदा आहेत. पण सनी मेकअपशिवाय खूपच वेगळी दिसते.

मेकअपशिवाय सनी लिओनीला ओळखणे देखील होते अशक्य, पाहा तिचे हे फोटो
ती आहे बोल्ड, ती आहे बिनधास्त... ती आहे इंटरनेटवरील मोस्ट सर्च सेलिब्रिटी, नेटिझन्सना तिने अक्षरक्षः वेड लावलं आहे. बॉलिवूडची मस्तानी, देसी गर्लसुद्धा तिच्यापुढे फ्लॉप. ही ती म्हणजे पॉर्नस्टार आणि बोल्ड तसंच हॉट अभिनेत्री सनी लिओनी. इंडो-कैनेडियन असलेल्या सनी लिओनीला प्रचंड लोकप्रियता असून तिचे चाहते जगभरात आहेत.
सनीच्या सौंदर्यावर तर अनेक जण फिदा आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, तुमची लाडकी सनी मेकअपशिवाय खूपच वेगळी दिसते. तिला या फोटोंमध्ये ओळखणे देखील कठीण जाते. तिचे काही बिनामेकअपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सनीने 'जिस्म २’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. 'बिग बॉसच्या ५ व्या' सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. याच कार्यक्रमामुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली आणि तिच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले.
सनीने काही महिन्यांपूर्वी तिचा अगदी बालपणापासून ते बॉलिवूडपर्यंतचा जीवनप्रवास तिच्या वेब सीरिजच्या माध्यमातून लोकांसमोर आणला होता. सनीची वेबसीरिज 'करणजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी' रिलीज झाल्यानंतर तिचं अवघं आयुष्य एका पुस्तकाप्रमाणे जगासमोर आलं. सनीच्या या वेबसिरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.
बेबी डॉल सनी लिओनी आज बॉलिवूडची एक मोठी स्टार आहे. पण आजही तिची पॉर्न स्टार ही ओळख पूर्णपणे पुसली गेलेली नाही. बॉलिवूडमध्ये येण्याआधी सनी पॉर्न स्टार होती. पण पॉर्न स्टार बनण्यासाठीचा तिचा संघर्षही कमी नव्हता. एकेकाळी पैशांसाठी सनी पहाटे पेपर वाटायची. बेकरीमध्ये काम करायची. तिनेच या संघर्षाविषयी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे.