फोटोत दिसणा-या चिमुरडीला ओळखले का? आज बनलीय लाखो दिलों की धडकन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 18:22 IST2021-03-19T18:19:57+5:302021-03-19T18:22:21+5:30
Sunny Leone Childhood Photos: ती मोस्ट सर्च इंडियन सेलिब्रिटींच्या यादीतही गणली जाते. सनीचे खरे नाव करनजीत कौर असे आहे. सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.

फोटोत दिसणा-या चिमुरडीला ओळखले का? आज बनलीय लाखो दिलों की धडकन
सोशल मीडियावर अनेक कलाकारांंचे लहानपणीतले फोटो व्हायरल होत असतात. अनेकदा कलाकार त्यांचे गोंडस फोटो शेअर करत त्यांच्या जुन्या आठवणींना ऊजाळा देत असतात. अगदी त्याचप्रमाणे सनी लिओनीचा लहानपणीचा फोटो समोर आला आहे. हा फोटो पाहून चाहत्यांनीही भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज लाखो फॅन्ससाठी सनीही बोल्ड अभिनेत्री असेल. पण तिचा हा फोटो पाहून लाईक्स केल्याशिवाय चाहते पुढे जाऊच शकत नाही. इतकी ती त्या फोटोत क्युट दिसत आहे.
फोटोत दिसणारी गोंडस मुलगी आज चाहत्यांची बेबी डॉल नखरेवाली बनलीय..चोहीकडे सनीच्या हॉट अदांच्या चर्चा रंगल्या असतात. तिच्या अदा आणि नख-यांवर सारेच फिदा असतात. नेटीझन्समध्ये तिची जबरदस्त पॉप्युलॅरिटी आहे. इतकंच काय तर ती मोस्ट सर्च इंडियन सेलिब्रिटींच्या यादीतही गणली जाते. सनीचे खरे नाव करनजीत कौर असे आहे. सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. बिग बॉसच्या ५ व्या सीझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. याच रियालिटी शोमुळे ती प्रकाशझोतात आली होती. सनी लिओनी आपल्या बोल्ड अदांमुळे बॉलीवुडमध्ये यशाच्या शिखरावर पोहचली आहे. विविध सिनेमात सनी अनेक गाण्यांवर थिरकली आहे. सनीवर चित्रीत करण्यात आलेल्या आयटम नंबर्सना रसिकांचाही भरभरुन प्रतिसाद लाभला आहे.
रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली सनी कोट्यावधीची मालकीण आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीनुसार सनीकडे ९७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तिचे वार्षिक उत्पन्न २ कोटींच्या घरात आहे. याशिवाय १.१४ कोटी किंमतीच्या अनेक आलिशान आणि महागड्या गाड्यांचं कलेक्शन तिच्याकडे आहे. मुंबईतील तिच्या बंगल्याची किंमत जवळपास ३ कोटींच्या घरात आहे. याशिवाय अमेरिकेतही तिचा बंगला आहे.
या बंगल्याची किंमत जवळपास ३० कोटी आहे. सध्या सनी अभिनयासह तिचं आईपण एन्जॉय करत आहे. आपल्या मुलांसोबतचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. सनी सध्या तिचं आईपण एन्जॉय करतेय. पती डॅनिअल आणि मुलांसोबत सनी कायमच पाहायला मिळते. सोशल मीडियावर ती त्यांच्यासोबतचे फोटो शेअर करत असते.