रेड ड्रेस...अन् मादक अदा... सनी लिओनीचं नवीन गाणं 'मधुबन' झालं रिलीज; इंटरनेटचं वाढलं तापमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 20:58 IST2021-12-07T20:57:33+5:302021-12-07T20:58:20+5:30

सनी लिओनी आणि कनिका कपूर 'मधुबन' गाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले आहे.

Sunny Leone's new song 'Madhuban' released; Increased Internet temperature | रेड ड्रेस...अन् मादक अदा... सनी लिओनीचं नवीन गाणं 'मधुबन' झालं रिलीज; इंटरनेटचं वाढलं तापमान

रेड ड्रेस...अन् मादक अदा... सनी लिओनीचं नवीन गाणं 'मधुबन' झालं रिलीज; इंटरनेटचं वाढलं तापमान

बेबी डॉल दी सोने दी..असं म्हणत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणारी अभिनेत्री सनी लिओनी सातत्याने चर्चेत येत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि तेही तिच्या नवीन गाण्यांमुळे. मधुबन हे तिचे नवीन गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यातील तिचा बोल्ड अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या या गाण्यामुळे इंटरनेटवरील तापमान चांगलंच वाढलेले दिसत आहे.

सनी लिओनी आणि कनिका कपूर या गाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले आहे. मधुबन हे पार्टी साँग असून या गाण्यातील सनी लिओनीच्या अदांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या गाण्याची कोरियोग्राफी गणेश आचार्यने केली आहे. या गाण्याला सोशल मीडियावर खूपच पसंती मिळते आहे. 
भारतीय-कॅनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे. तिने 'जिस्म २' बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. या कार्यक्रमातून तिला खूप लोकप्रियता मिळाली होती.


आजच्या घडीला सनी लिओनी कोट्यावधीची मालकीण आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या रिपोर्ट्सनुसार तिच्याकडे ९७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तिचे वार्षिक उत्पन्न २ कोटींच्या घरात आहे. याशिवाय अनेक आलिशान आणि महागड्या गाड्यांचे कलेक्शन तिच्याकडे आहे. मुंबईतील तिच्या बंगल्याची किंमत जवळपास ३ कोटींच्या घरात आहे. याशिवाय अमेरिकेतही तिचा बंगला आहे. या बंगल्याची किंमत जवळपास ३० कोटी आहे. 

Web Title: Sunny Leone's new song 'Madhuban' released; Increased Internet temperature