सनी लिओनी आहे का उर्वशी रौतेलाची स्टाइल गुरू ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 17:52 IST2016-12-14T16:35:13+5:302016-12-14T17:52:20+5:30

'चेहरा क्या देखते हो' हे गाणे सा-यांनाच माहिती आहे. चेहराच एखाद्या व्यक्तीची ओळख असते. एकाच चेह-याच्या जगात सात व्यक्ती ...

Sunny Leone is Urvashi Routalachi style guru? | सनी लिओनी आहे का उर्वशी रौतेलाची स्टाइल गुरू ?

सनी लिओनी आहे का उर्वशी रौतेलाची स्टाइल गुरू ?

'
;चेहरा क्या देखते हो' हे गाणे सा-यांनाच माहिती आहे. चेहराच एखाद्या व्यक्तीची ओळख असते. एकाच चेह-याच्या जगात सात व्यक्ती असतात असे बोलले जाते. सामान्य असो किंवा सेलिब्रिटी मंडळी यांच्या चेह-याशी साधर्म्य असणा-या व्यक्ती या जगात पाहायला मिळतात. बी-टाऊनमध्ये तर खास दिग्गज कलाकारांचे लूक ए लाईक आहेत. मग ते बिग बी अमिताभ बच्चन असो किंवा मग शाहरुख खान. या कलाकारांना जितकी पसंती मिळाली तितकीच त्याच्या लूक ए लाईकलासुद्धा पसंती मिळाली. मात्र एखाद्या सेलिब्रिटीची लूक ए लाइक सेलिब्रिटी असेल तर त्याची चर्चा सर्वाधिक होते. ऐश्वर्या राय आणि स्नेहा उल्लाल असो किंवा कॅटरिना कैफ-झरीन खान असो या अभिनेत्रींच्या चेह-यांमधील साम्य कुणालाही थक्क करेल.बॉलीवुडच्या आणखी एका अभिनेत्रीचा चेहरा एका बॉलीवुडच्या सेक्सी अभिनेत्रीशी मिळताजुळता आहे. बॉलीवुडची अभिनेत्री उर्वशी रौतेला हिचा चेहरा पॉर्न स्टार आणि सेक्सी-हॉट अभिनेत्री सनी लिओनीशी मिळताजुळता असल्याच्या चर्चा सुरु आहेत. 



उर्वशीचा चेहरा, तिची हॉट आणि सेक्सी अदा हुबेहूब पॉर्नस्टार सनी लिओनीसारख्याच आहेत. तिच्या मादक अदा सनीप्रमाणेच कुणालाही घायाळ करणा-या अशाच आहेत. 



सनीप्रमाणेच उर्वशीच्या फॅशन स्टाईल आणि कपड्यांमध्येही कमालीचं साम्य पाहायला मिळतंय.उर्वशीची ड्रेसिंग असो किंवा मग हेअरस्टाईल, तीचे एक्सप्रेशन असो किंवा मग चालण्या बोलण्याची स्टाईल अगदी सनीशी मिळती जुळती आहे म्हणून जेव्हा जेव्हा उर्वशी दिसते तेव्हा आपण सनी लिओनीला पाहतोय की काय असा भास झाल्याशिवाय राहात नाही 


Web Title: Sunny Leone is Urvashi Routalachi style guru?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.