‘सिम्बा’ चित्रपटातील ‘आँख मारे’ गाण्यावर पतीसोबत थिरकली सनी लिओनी; व्हिडीओ चर्चेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 21:00 IST2019-01-22T21:00:00+5:302019-01-22T21:00:02+5:30

बॉलिवूडची हॉट अ‍ॅण्ड ब्युटीफुल असलेल्या सनी लिओनी हिने तिचा नवरा डॅनिअल वेबर याच्यासोबत ‘आँख मारे’ या गाण्यावर डान्स केला. तो तिला इतका आवडला की, तो तिने चक्क तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर देखील केला.

'Sunny Leone' in 'Simea' song with her husband; Video chat! | ‘सिम्बा’ चित्रपटातील ‘आँख मारे’ गाण्यावर पतीसोबत थिरकली सनी लिओनी; व्हिडीओ चर्चेत!

‘सिम्बा’ चित्रपटातील ‘आँख मारे’ गाण्यावर पतीसोबत थिरकली सनी लिओनी; व्हिडीओ चर्चेत!

 रणवीर सिंग आणि सारा अली खान यांच्या ‘सिम्बा’ चित्रपटातील  ‘आँख मारे’ या गाण्याने चाहत्यांना अक्षरश: वेड लावले आहे. त्यासोबतच कलाकारांनाही या गाण्याने पुरते वेडे केले आहे. आता हेच बघा ना, बॉलिवूडची हॉट अ‍ॅण्ड ब्युटीफुल असलेल्या सनी लिओनी हिने तिचा नवरा डॅनिअल वेबर याच्यासोबत ‘आँख मारे’ या गाण्यावर डान्स केला. तो तिला इतका आवडला की, तो तिने चक्क तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर देखील केला. सनी लिओनी ही कायम तिच्या चाहत्यांसोबत संपर्कात असते. ती तिचे फोटो आणि व्हिडीओज यांच्या माध्यमातून चाहत्यांना खूश ठेवते. तिने शेअर केलेला हा डान्स व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आवडेल ना पाहायला?

रणवीर सिंग आणि सारा अली खानच्या 'सिम्बा' चित्रपटातील 'आँखे मारे' गाण्यावर सनी आपल्या नवऱ्यासोबत थिरकताना दिसत आहे. सध्या हे कपल सिलिगुडीमध्ये आपला क्वालिटी टाईम स्पेंड करत होते. सनीने इन्स्टाग्रामवर १८ मिलियन फॉलोअर्स झाल्याच्या आनंदात हा डान्स व्हिडिओ पोस्ट केला आहे. सध्या हे कपल बांग्लादेशमधील ढाका येथे गेले आहे. तिच्यासोबत तिची मुलगी निशा आणि दोन्ही मुले देखील असतात. सध्या ती फॅमिली टाईम घालवत असल्याचे चित्र आहे. 

Web Title: 'Sunny Leone' in 'Simea' song with her husband; Video chat!