सनी लिओनीने Old अभिनेत्रींचे Bold फोटो शेअर करून म्हटले, ‘यांनी मला गुरूमंत्र दिला’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 19:58 IST2017-12-21T14:28:49+5:302017-12-21T19:58:49+5:30
बॉलिवूडची आयटम गर्ल सनी लिओनी सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियामुळेच अधिक चर्चेत आहे. आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणाºया सनीने ...

सनी लिओनीने Old अभिनेत्रींचे Bold फोटो शेअर करून म्हटले, ‘यांनी मला गुरूमंत्र दिला’!
ब लिवूडची आयटम गर्ल सनी लिओनी सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियामुळेच अधिक चर्चेत आहे. आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणाºया सनीने सोशल मीडियावर एक फोटो अपलोड करून खळबळ उडवून दिली आहे. जुन्या अभिनेत्रींचे बोल्ड फोटो शेअर करून सनीने स्वत:चाही उल्लेख केला आहे. सनीने म्हटले की, ग्लॅमर आणि फिल्म उद्योगाचा लौकिक जगात जसा आहे तसाच कायम असायला हवा. सनीने पुढे लिहिले की, ‘जशी आहे तशीच राहण्याचा गुरुमंत्र मला शर्मिला टागोर, झीनत अमान, मधुबाला आणि रेखा यांसारख्या अभिनेत्रींकडून मिळाला आहे. या अभिनेत्रींकडून मला आजही खूप प्रोत्साहन मिळत असल्याचेही सनीने म्हटले.
![]()
![]()
विशेष म्हणजे सनीने या सर्व अभिनेत्रींचे जे फोटो पोस्ट केले ते सर्व फोटो बोल्ड आणि सेक्सी अवतारातील आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये सनीने लिहिले की, ‘बॉलिवूडमध्ये मोजक्याच अभिनेत्री आहेत, ज्यांच्याकडून मी जशी आहे तशीच राहण्याची शिकवण आत्मसात केली आहे.’ दरम्यान, सनीने हे फोटो पोस्ट करून सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. अर्थात काही यूजर्सकडून सनीवर टीकाही केली जात आहे.
![]()
![]()
काही दिवसांपूर्वीच सनीने इमेज बदलण्यासाठी साउथकडे आपला मोर्चा वळविल्याची चर्चा रंगली होती. सनीला एक साउथचा चित्रपटही मिळाला असल्याचे समोर आले. परंतु सनीने इमेज बदलण्याची चर्चा ही काही लोकांकडून पसरविली जात असल्याचे म्हटले होते. तसेच मला माझ्या इमेजचा पश्चाताप होत नसून, स्वत:वर गर्व वाटत असल्याचे तिने म्हटले. सनीच्या या वक्तव्यानंतर तिच्यावर सोशल मीडियावर टीकेची एकच झोड उठली. अनेकांनी तिच्या पूर्वीच्या इमेजवरून तिच्यावर निशाणा साधला. परंतु सनीने अशाप्रकारे टीकाकारांना उत्तर देणे पसंत केले.