Sunny Leone: लाल ड्रेस...मादक अदा अन् बोल्ड अवतार... सनी लिओनीच्या नव्या गाण्याची झलक पाहून चाहते घायाळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 20:13 IST2021-10-13T20:12:07+5:302021-10-13T20:13:39+5:30
Sunny Leone share New Song Pardesi Teaser: सनी लिओनी (Sunny Leone) पुन्हा दमदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Sunny Leone: लाल ड्रेस...मादक अदा अन् बोल्ड अवतार... सनी लिओनीच्या नव्या गाण्याची झलक पाहून चाहते घायाळ!
Sunny Leone share New Song Pardesi Teaser: सनी लिओनी (Sunny Leone) पुन्हा दमदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकतंच तिचं एक नवं गाणं प्रदर्शित झालं होतं आता गुरुवारी तिचं आणखी एक जबरदस्त गाणं चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नव्या गाण्याची एक झलक सनी लिओनीनं आज इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. सनीनं तिच्या नव्या 'परदेसी' गाण्याचा टिझर पोस्ट केला आहे. यात सनी लिओनीचा चेहरा दिसून येत नसला तरी तिच्या मादक अदांनी सर्व जण घायाळ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
गाण्याचा टीझर पाहून तुमची उत्कंठा वाढली असेल तर तुम्हाला संपूर्ण गाणं पाहण्यासाठी एका दिवसाची वाट पाहावी लागणार आहे. गुरुवारी १४ ऑक्टोबर रोजी सनीचं हे नवं गाणं प्रदर्शित होणार आहे. सकाळी ११ वाजता हे गाणं प्रदर्शित केलं जाणार आहे.
सनीच्या 'बार्बी डॉल' गाण्याचा धडाका
नुकतंच प्रदर्शित झालेल्या सनी लिओनीच्या 'बार्बी डॉल' गाण्यानं धुमाकूळ घातला आहे. गेल्या २४ तासांत गाण्याला २२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियात सनी लिओनी तिच्या नव्या गाण्यांसोबतच तिच्या पोस्टसाठीही खूप चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सनीनं तिच्या सोशल मीडिया हँडलवर स्विम सूटमधला एक फोटो शेअर केला होता. या फोटोचीही जोरदार चर्चा झाली होती. तिनं आपल्या राहत्या घराच्या टेरेसवरील स्विमिंग पूलमध्ये फोटो क्लिक केला होता. सोशल मीडियात सनीच्या फोटोवर लाइक्सचा पाऊस पडला होता.