सनी लिओन म्हणते, मला चित्रपटात ‘विशेष’ भूमिकेसाठीच घेतले जाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 19:47 IST2016-12-10T18:34:32+5:302016-12-10T19:47:07+5:30

बॉलिवूडमध्ये जम बसविणारी सनी लिओन हिने बॉलिवूडमध्ये एका विशेष प्रकारच्या रोलसाठी घेतले जाते अशी खंत व्यक्त केली. सनी म्हणाली, ...

Sunny Leone says, "I am taken for the role of 'special' in the film | सनी लिओन म्हणते, मला चित्रपटात ‘विशेष’ भूमिकेसाठीच घेतले जाते

सनी लिओन म्हणते, मला चित्रपटात ‘विशेष’ भूमिकेसाठीच घेतले जाते

ong>बॉलिवूडमध्ये जम बसविणारी सनी लिओन हिने बॉलिवूडमध्ये एका विशेष प्रकारच्या रोलसाठी घेतले जाते अशी खंत व्यक्त केली. सनी म्हणाली, मला हिंदी येत नाही हे खरे आहे, मात्र मला चित्रपटात हिंदी डॉयलॉग बोलण्यासाठी घेतले जात नाही तर एका खास भूमिकेसाठीच माझी निवड केली जाते.

टाईम मॅगझिनने नुकतीच जगभरातील सर्वांत प्रभावी १०० महिलांची यादी प्रसिद्ध केली. यात सनी लिओनचे नाव पाहून सर्वांना आश्चर्य वाटले होते. अमेरिकन पोर्न इंडस्ट्री ते बॉलिवूड अभिनेत्री होण्याचा तिचा प्रवास अडचणींनी भरला आहे. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सनीने बॉलिवूडमध्ये तिच्या विषयी असलेल्या प्रसिद्धीबद्दल चर्चा केली. सनी लिओन म्हणाली, मला माहिती आहे माझी हिंदी चांगली नाही. मी हिंदी शिकत आहे. मात्र मला हे माहित आहे की मला चित्रपटात हिंदी बोलण्यासाठी घेतले जात नाही. मला विशेष प्रकारचे रोल आॅफ र केले जातात. मात्र, मी माझे काम करते. कामाव्यतिरिक्त मी कुणाशी जास्त संबंध ठेवत नाही आणि कुणीही ठेऊ नये. 

Sunny Leone on how objectification isn

बॉलिवूड निर्माते व अभिनेत्यांना तिच्या विषयी संशय वाटतो, यावर सनी म्हणाली, माझ्याही असेच कानावर आहे. मात्र, हे त्यांच्यावर नाही तर एका स्त्रीवर अवलंबून आहे की तिने कुणासोबत काम करावे. लोक मला काम करण्यासाठी पैसे देतात त्याबदल्यात मी काम करते. मी कोणते काम करावे यासाठी स्वतंत्र आहे. 

बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींना आॅब्जेक्टिफाय किंवा उपभोगाच्या वस्तू प्रमाणे दाखविण्यावर सनीचे मत वेगळे पडले, ती म्हणते, आपण येथे पुरुषांचा देखील वापर करतो. हृतिक रोशन शर्ट काढताना पाहत नाही काय? आम्ही (कलाकार) ब्रँड आहोत आणि आम्ही ज्या प्रमाणे स्वत:ला दाखवितो तेच ब्रँड आहे. आम्ही असे करणार नाही तर आम्हाला कोण पाहणार? ही या क्षेत्राची गरज आहे. हे आॅब्जेक्टेफिकेशन नाही तर आमच्या भावनांशी ते जुळले आहे. 

Sunny Leone on how objectification isn

Web Title: Sunny Leone says, "I am taken for the role of 'special' in the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.