काय सिनेमा सोडून सनी लिओनी करणार ‘हे’ काम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 16:00 IST2019-05-26T16:00:00+5:302019-05-26T16:00:02+5:30

सोशल मीडियावर कमालीच्या सक्रिय असलेल्या सनीने अलीकडे एक फोटो शेअर केला आणि सनीविषयी एक वेगळीच चर्चा सुरु झाली.

is sunny leone planning to change her career | काय सिनेमा सोडून सनी लिओनी करणार ‘हे’ काम?

काय सिनेमा सोडून सनी लिओनी करणार ‘हे’ काम?

ठळक मुद्देअलीकडे २३ मे ला लोकसभा निवडणुकीच्या निकालावेळी एका चॅनेलच्या अँकरने पंजाबच्या गुरदासपूर मतदार संघांची बातमी देताना सनी देओलच्या  जागी सनी लिओनीचे नाव घेतले होते. सनीनेही यावरून संबंधित अँकरची फिरकी घेतली होती.

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी हिची पॉर्न स्टार ही ओळख कधीच पुसली गेलीय. आज ती बॉलिवूडमधील एक लोकप्रिय चेहरा बनली आहे. सोशल मीडियावर कमालीच्या सक्रिय असलेल्या सनीने अलीकडे एक फोटो शेअर केला आणि सनीविषयी एक वेगळीच चर्चा सुरु झाली. होय, सनीने शेअर केलेला हा फोटो पाहून ती आता राजकारणात प्रवेश करणार की काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला.


होय, सनीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. या फोटोत सनी एक बुलडोझरच्या टायरवर उभी दिसतेय. या फोटोला सनीने काय कॅप्शन द्यावे तर, ‘करिअर चेंज’ असे. हे कॅप्शन ज्याने कुणी वाचते, त्यांना सनी आता सिनेमा सोडून राजकारणात प्रवेश करणार की काय असा प्रश्न पडला. अर्थात असे काही नाही, हे सांगायलाही सनी विसरली नाही. तुम्ही तिचे कॅप्शन जरा बारकाईने बघितले की, तुम्हालाही ते कळेल.


अलीकडे २३ मे ला लोकसभा निवडणुकीच्या निकालावेळी एका चॅनेलच्या अँकरने पंजाबच्या गुरदासपूर मतदार संघांची बातमी देताना सनी देओलच्या  जागी सनी लिओनीचे नाव घेतले होते. सनीनेही यावरून संबंधित अँकरची फिरकी घेतली होती. मी किती मतांनी पुढे आहे, असे ट्वीट तिने केले होते. तिच्या या ट्वीटचा संबंध तिच्या ‘करिअर चेंज’शी जोडला जातोय. 


टीव्ही अँकरच्या या चुकीवर मॅनफोर्स कॉन्डम कंपनीनेही त्याची फिरकी घेतली होती.   डियर... आम्हाला माहीत आहे ती(सनी लिओनी) नेहमीच तुझ्या डोक्यात असते. मॅनफोर्सचे हे ट्वीट खूप व्हायरलही झाले होते.  

Web Title: is sunny leone planning to change her career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.