Sunny Leoneचे सोशल मीडिया अकाऊंट झाले ब्लॉक, अभिनेत्री भडकली म्हणाली-हे खूप वाईट....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 12:53 IST2023-02-27T12:49:27+5:302023-02-27T12:53:54+5:30

सनी निओनीचं Linkedin अकाऊंट ब्लॉक करण्यात आले आहे. अभिनेत्रीने स्वत: व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली.

Sunny leone linkedin account gets blocked actress shares video netizens react | Sunny Leoneचे सोशल मीडिया अकाऊंट झाले ब्लॉक, अभिनेत्री भडकली म्हणाली-हे खूप वाईट....

Sunny Leoneचे सोशल मीडिया अकाऊंट झाले ब्लॉक, अभिनेत्री भडकली म्हणाली-हे खूप वाईट....

बॉलिवूडची 'बेबी डॉल' म्हणजेच सनी लिओनी (Sunny Leone)चित्रपटांव्यतिरिक्त सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अभिनेत्री स्वत:शी संबंधित काही ना काही अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते.चाहत्यांना देखील त्यांच्या आवडत्या स्टारशी संबंधित सर्व काही जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. आता नुकताच सनी लिओनीने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये अभिनेत्री काहीशी नाराज दिसत आहे. सनीने या समस्येचे कारणही सांगितले आहे. जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाविषयी.


सनी लिओनीचे लिंक्डइन अकाऊंट ब्लॉक केलं आहे. याबाबतची माहिती खुद्द अभिनेत्रीने दिली आहे. सनीने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या प्रकरणाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणते, 'लिंक्डइनवर एक महिना झाल्यानंतर त्यांनी माझे खाते ब्लॉक केलं, त्यांना वाटले की ही खरी सनी लिओनी नाही मी ती मीचं आहे.'

अभिनेत्री म्हणाली, 'माझ्या अकाऊंटवर खूप ट्रॅफिक होते हे मला समजले आहे, पण फक्त या कारणामुळे माझं अकाऊंटवर ब्लॉक करणं योग्य नाही. हे खूप वाईट आहे... मला आशा आहे की ते त्यांचा निर्णय बदलतील, हा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी मला कळवले नाही किंवा मला ईमेलही केला नाही. अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर आता चाहते तिला सपोर्ट करताना दिसत आहेत. 

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सनी लिओनी सध्या तिच्या आगामी 'कोटेशन गँग'(Quotation Gang)  या चित्रपटासाठी चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सनी लिओनीशिवाय जॅकी श्रॉफही कोटेशन गँगमध्ये दिसणार आहे. हे. 'कोटेशन गँग' हा तमिळ चित्रपट असून तो हिंदी, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे.


 

Web Title: Sunny leone linkedin account gets blocked actress shares video netizens react