मुलगी निशा सोबत स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसली सनी लिओनी, See Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 13:41 IST2020-08-18T13:38:42+5:302020-08-18T13:41:39+5:30
सनी लिओनी आपल्या बोल्डनेसमुळे सतत चर्चेत असते.

मुलगी निशा सोबत स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसली सनी लिओनी, See Video
सनी लिओनी आपल्या बोल्डनेसमुळे सतत चर्चेत असते. सध्या सनी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर ती तिचे हॉट फोटो शेअर करत असते. पुन्हा एकदा सनी तिच्या अशाच एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. सनीने मुलगी निशासोबतचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत सनी, निशा आणि तिच्या मैत्रिणीसोबत स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसतेय. या तिघी ही स्विमिंग पूलमध्ये एकत्र उडी मारताना दिसतायेत. चाहते निशाचे कौतुक करत आहेत. काही महिन्यापूर्वी निशा घोडेस्वारी शिकत असल्याचे पाहायला मिळते आहे.
काही दिवसांपूर्वी सनीने पती डेनियलसोबत प्रँक करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत डेनियल झोपेत होता तेव्हा सनी त्याच्याजवळ जाऊन पाण्याने भरलेले फुगा फोडते ज्यामुळे डेनियल अचानक झोपेतून उठतो. वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर सनी रागिनी एमएमस 2 मध्ये दिसली होती. सनी 'वीरामादेवी' आणि 'कोका कोला'मध्ये दिसणार आहे.