सनी लिओनी अन् उर्फीचा प्रेमळ जिव्हाळा; २ हॉट अभिनेत्रींचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 12:00 IST2023-03-27T11:59:02+5:302023-03-27T12:00:23+5:30

उर्फी आणि सनीचा व्हिडिओ आणि कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

Sunny Leone and Urfi javed's love affair; Video of 2 hot actresses viral | सनी लिओनी अन् उर्फीचा प्रेमळ जिव्हाळा; २ हॉट अभिनेत्रींचा व्हिडिओ व्हायरल

सनी लिओनी अन् उर्फीचा प्रेमळ जिव्हाळा; २ हॉट अभिनेत्रींचा व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनी आणि सोशल मीडियातून कायम चर्चेत असलेली टीव्ही स्टार उर्फी जावेद या दोघींना एकत्र पाहणं म्हणजे चाहत्यांना पर्वणीच. दोन हॉट ललनांच्या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ओटीटी प्ले अवॉर्डमध्ये सनी आणि उर्फी एकत्र आल्या होत्या. त्यावेळी, उर्फीने सनी लिओनीला हाताला धरुन तिच्यासोबत फोटोसाठी पोज दिल्या. उर्फी आणि सनीमधील हा प्रेमळ जिव्हाळा अनेकांना भावला असून दोघींना एकत्र पाहणं हा डबल धमाका असल्याचं नेटीझन्स म्हणत आहेत.

उर्फी आणि सनीचा व्हिडिओ आणि कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सनी लिओनी पांढऱ्या रंगाच्या वनपीसमध्ये दिसून येते, तर उर्फीने विचित्र फॅशनच्या निळ्या रंगातील हॉट टॉपमध्ये पाहायला मिळते. उर्फीने परिधान केलेल्या टॉपमध्ये तिने सनी लिओनीपेक्षाही जास्त अंगप्रदर्शन केलंय. दोघींना एकत्र पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यापुढे, दोघींनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, अशी मागणीही चाहते करत आहेत. व्हायरल बयानी या इंस्टा हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय.

 

Web Title: Sunny Leone and Urfi javed's love affair; Video of 2 hot actresses viral