​सनी पुन्हा करणार तेलुगू फिल्म?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2016 11:29 IST2016-05-07T05:57:55+5:302016-05-07T11:29:48+5:30

सनी लियोन अशी अभिनेत्री आहे जी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सदैव चर्चेत राहते. मीडिया आणि लोकांना तिच्या प्रत्येक गोष्टीची ...

Sunny to do Telugu film again? | ​सनी पुन्हा करणार तेलुगू फिल्म?

​सनी पुन्हा करणार तेलुगू फिल्म?

ी लियोन अशी अभिनेत्री आहे जी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सदैव चर्चेत राहते. मीडिया आणि लोकांना तिच्या प्रत्येक गोष्टीची खबर ठेवावी वाटते.

मग ती काय बोलते इथपासून ते तिच्या चित्रपटांबद्दल सतत नवीन बातम्या येत असतात. बरं सनीचा प्रभाव केवळ बॉलिवूडमध्ये असेल अशी तुमची समजुत असेल तर ती खोडून टाका.

कारण साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्येसुद्धा तिला बॉलिवूड एवढीच मागणी आहे. म्हणून तर सनी दुसऱ्यांदा तेलुगू चित्रपटात काम करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. 2014 साली आलेल्या ‘करंट थीगा’ नावाच्या सिनेमात ती झळकली होती. आता तिला ‘बर्रा कथा’ सिनेमाची आॅफर आली आहे.

नवदिग्दर्शक संजीव कुमारच्या या चित्रपटात मात्र सनी केवळ पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. नवीन चंद्रा हा चित्रपटाचा हीरो असून हैदराबादेत शुटिंग सुरू आहे. या महिन्याच्या शेवटी सनी शुटिंगला सुरूवात करणार असल्याची माहिती मिळत आहे.

आता सनीच्या चाहत्यांना सिनेमा तेलुगू असो वा हिंदी, याने काही फरक पडत नाही. फारच थोड्या काळात तिने इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. सध्या तिचा ‘वन नाईट स्टँड’ हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे.

Web Title: Sunny to do Telugu film again?